22 September 2020

News Flash

अरे, हा राणादा नव्हं!

चित्रपटसृष्टीपासून टेलिव्हिजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी यंदा सनई-चौघडे वाजले.

सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. चित्रपटसृष्टीपासून टेलिव्हिजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी यंदा सनई-चौघडे वाजले. प्रार्थना बेहरे, शशांक केतकर, रोहन गुजर, पुजा पुरंदरे हे सेलिब्रिटी गेल्या काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. तर येत्या गुरुवारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सचिन देशपांडे साखरपुडा करणार आहे. यातच आता अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी कधी लग्न करतोय याकडे नक्कीच सर्वांच्या नजरा लागल्या असतील यात शंका नाही.

‘होणार सून ..’ फेम मनिषही अडकणार लग्नाच्या बेडीत

कोल्हापुरातील रांगड्या मर्दाची भूमिका साकारणाऱ्या हार्दिकने कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतीच त्याच्या नावाची एक पोस्ट व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने लग्न केल्याचे बोलले जात असून, त्याचा लग्नातला फोटो व्हायरल होतोय. पण, या फोटोमागचे सत्य काही वेगळेच आहे. या फोटोत वराच्या वेशात दिसणारा रुबाबदार तरुण हार्दिक नाहिये. तर हा दुसराच कोणीतरी तरुण आहे.

राणी मुखर्जीच्या लग्नाबाबतही कोणालाच माहिती नव्हती- अनुष्का शर्मा

एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोतील तरुणाची राणाप्रमाणेच शरीरयष्टी असल्याचे दिसते. त्याचा लूकही हार्दिक सारखाच आहे. मात्र, हा फोटो निरखून पाहिल्यास ती व्यक्ती हार्दिक नसल्याचे स्पष्ट दिसते. हार्दिकच्या लग्नाचे वृत्त ऐकून ज्या तरुणींचे हृदय तुटले असेल त्यांच्यासाठी ही नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 1:05 am

Web Title: marriage photo viral on a name of tujhyat jeev rangala fame ranada aka hardeek joshi
Next Stories
1 ‘करिना तुझा अभिमान वाटतो’
2 ‘लैंगिक शोषणकर्त्यांचं नाव सांगेन पण एका अटीवर…’
3 हृतिकसोबत काम करण्यासाठी तब्बल १५ हजार लोकांनी दिलं ऑडिशन
Just Now!
X