News Flash

हॉलिवूडपटापेक्षा दीपिकाला स्वत:चं लग्न महत्त्वाचं?

आता बी- टाऊनच्या या 'बाजीराव मस्तानी'च्या नात्याला नेमकं कोणतं वळण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, ranveer, deepika

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनत बऱ्याच सेलिब्रिटी जोडप्यांनी विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. २०१७च्या अखेरीस अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहलीने लग्नगाठ बांधल्यानंतर सर्वांच्याच नजरा एका बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीकडे वळल्या. ती सेलिब्रिटी जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची.

रणवीर आणि दीपिका बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असून, आता ते त्यांच्या नात्याचा गांभीर्याने विचार करतील अशी चिन्हं होती. किंबहुना यंदाच्या वर्षअखेरीस त्याच्या लग्नाचंही वृत्त येईल असं म्हटलं गेलं होतं. पण, त्यावनंतर मात्र या चर्चा काहीशा शमल्या होत्या. आता पुन्हा एकदा दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामागे कारम ठरतोय एक हॉलिवूडपट.

सोशल मीडियावर राहुल राऊत या व्यक्तीच्या ट्विटमुळे ही बाब सर्वांसमोर आली आहे. या ट्विटमध्ये त्याने स्पष्ट केल्यानुसार दीपिकाला एका हॉलिवूडपटाची ऑफर आली होती. पण, तिने हा प्रस्ताव नाकारला. कारण त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचं वेळापत्रक दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या तारखांच्या वेळीच निर्धारित करण्यात आलं होतं.

सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या या ट्विटमध्ये मांडण्यात आलेल्या गोष्टींविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, ज्या व्यक्तीने ट्विट केलं आहे, त्याच्या फॉलोअर्सच्या यादीत असणारी नावं ही कलाविश्व आणि माध्यमांशी जोडलेली असल्यामुळे एका अर्थी दीपिका- रणवीर खरंच या वर्षअखेरीस लग्नगाठ बांधणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा अनेकांच्या मनात घर करुन गेला आहे.

वाचा : रणबीर- आलियाच्या प्रेमप्रकरणामुळे दुखावली कतरिना?

tweet tweet, ranveer, deepika

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ट्विटमध्ये मांडण्याच आलेल्या गोष्टी पाहता दीपिकाने हॉलिवूडपटाऐवजी तिच्या खासगी आयुष्याला महत्त्वं दिलं आहे, असंही म्हटलं जात आहे. तेव्हा आता बी- टाऊनच्या या ‘बाजीराव मस्तानी’च्या नात्याला नेमकं कोणतं वळण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 11:36 am

Web Title: marriage with actor ranveer singh more important than a big budget hollywood film for bollywood actress deepika padukone
Next Stories
1 Sanju : ‘संजू’मधील नर्गिस यांची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
2 रजनी द बॉस…’काला’ चित्रपट पाहण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून चाहत्यांची थिएटरबाहेर गर्दी
3 शबाना आजमी यांना मागावी लागली भारतीय रेल्वेची जाहीर माफी
Just Now!
X