23 January 2020

News Flash

‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’नंतर मार्व्हल स्टुडिओजकडून नव्या ११ प्रोजेक्ट्सची घोषणा

मार्व्हल स्टुडिओज पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज

सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्व्हल स्टुडिओजने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. काही दिवसापूर्वी मार्व्हलचा ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. मात्र ही सिरीज संपल्यानंतर मार्व्हलचा आगामी चित्रपट कोणता असेल याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यातच मार्व्हल स्टुडिओजकडून त्यांच्या आगामी ११ चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे.

मार्व्हल स्टुडिओजच्या चौथ्या टप्प्यामध्ये थॉर ४, द फॅल्कन अँण्ड द विंटर सोल्जर आणि डॉक्टर स्ट्रेंज २ या चित्रपटांसह अनेक चित्रपट येत्या दोन वर्षांमध्ये म्हणजेच २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  ‘ब्लॅक विडो’, ‘थॉर- लव अ‍ॅण्ड थंडर’, ‘हॉकआय’,’व्हॉट इफ..?’,’डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ ,’लोकी’,’वांडाव्हिजन’,’शांग-ची एण्ड द लीजेंड ऑफ द टेन रिंग्स’, ‘द फॅल्कन अँण्ड द विंटर सोल्जर’,’द इटरनल्स’ मार्व्हलचे असे ११ चित्रपट येत्या दोन वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

ब्लॅक विडो या चित्रपटामध्ये स्कार्लेट जोहारसन मुख्य भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट मे २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर थॉर- लव अॅण्ड थंडर हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात क्रिस हेमस्वॉर्थ, टेसा थॉम्पसन आणि नेटली पोर्टमेन मुख्य भूमिकेत असणार.


दरम्यान, ‘हॉकआय’वर एक ओरिजनल वेबसीरिजही तयार करण्यात येणार आहे. यात जेरेमी रेनर मुख्य भूमिका वठविणार आहे. व्हॉट इफ..? ही अॅनिमेटेड सिरीज असणार आहे. मार्व्हलने डॉक्टर स्ट्रेंजच्या सीक्वलचीही घोषणा केली आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिवर्स आॅफ मॅडनेस’ हा सीक्वल २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

First Published on July 22, 2019 8:52 am

Web Title: marvel studios announces 11 upcoming movies after avengers endgame ssj 93
Next Stories
1 प्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात…
2 नाट्यक्षेत्रातील तरुण कलाकाराच्या आत्महत्येने पुण्यात खळबळ
3 ‘सुपर ३०’ची १०० कोटींच्या दिशेने घोडदौड सुरु, ९ दिवसात कमावले इतके कोटी
Just Now!
X