News Flash

PHOTOS : ‘मसान’ फेम बॉलिवूड अभिनेत्रीची लगीनघाई

नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत गोव्यात श्वेता- चैतन्यचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

shweta mehendi
छाया सौजन्य- सोशल मीडिया

‘मसान’ या चित्रपटातून लोकप्रयतेच्या शिखरावर पोहोलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आता एका सुरेख प्रवासाची सुरुवाच करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच प्रियकर चैतन्य शर्मा याच्यासोबत लग्नगाठ बांधणार असून, सध्या सोशल मीडियावर श्वेताच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो चर्चेत आले आहेत.

पिवळ्या रंगाच्या सोबर आणि तितक्याच सुरेख अशा मिड लेंथ ड्रेसला श्वेताने मेहंदीसाठी पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद बरंच काही सांगत होता. श्वेताच्या लग्नसोहळ्यामध्ये ‘लव्ह स्टोरी’ ही थीम जास्त प्रमाणात पाहायला मिळाली. तिच्या हातांवरील मेहंदीतही याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. श्वेता आणि चैतन्यच्या प्रेमाचा प्रवास सुरु झाल्यापासून लग्नाच्या निर्णयावर पोहोचेपर्यंतचा त्यांचा प्रवास या मेहंदीतूनही साकारण्यात आला आहे.

अभिनेता आणि रॅपर चैतन्य शर्मासोबत ती २९ जूनला लग्नगाठ बांधणार आहे. चैतन्य श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. मोजके नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत गोव्यात श्वेता- चैतन्यचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

दरम्यान, श्वेतानेच एका मुलाखतीत तिच्या आणि चैतन्यच्या प्रेमकहाणीवरुन पडदा उचलला होता. मेसेंजरपासून सुरु झालेला त्यांचा हा सुरेख प्रवास कधी रिलेशनशिपच्या टप्प्यावर येऊन पोहोचला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. श्वेताचा वेडेपणा, खोडकरपणा या सर्व गोष्टी त्यांच्या मनाचा ठाव घेत होत्या. अॅम्युझमेंट पार्कमध्ये श्वेताला प्रपोज करणाऱ्या तिच्या प्रियकराने कधीच तिच्या स्वभावाविषयी खंत व्यक्त केली नाही. आज त्यांच्या नात्याने पाच वर्षे ओलांडली असून, आपल्या स्वभावासह आपला स्वीकार करणाऱ्या या एका व्यक्तीसाठी श्वेता नेहमीच आपण कृतज्ञ असल्याचं म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 4:42 pm

Web Title: masaan fame bollywood actress shweta tripathis bridal mehendi photo
Next Stories
1 ते गाणं पाहायचीही इच्छा होत नाही; ‘धडक’मधील झिंगाट ट्रोल
2 ..’हा’ आहे प्रियांकाचा ‘फेव्हेरट मॅन’
3 कतरिना कैफ आणि जॅकलिनमध्ये वादाची ठिगणी?
Just Now!
X