News Flash

“मसाबा गुप्ता की ‘कराटे किड’मधला जेडन स्मिथ?’ चाहत्यांचा पडला प्रश्न!

मसाबाने शेअर केले लहानपणीचे फोटो

डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता नुकतीच तिच्या ‘मसाबा मसाबा’ या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. आता ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. मसाबाने आपल्या लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मसाबाने केसांच्या वेण्या घातल्या आहेत. तिने या फोटोंना कॅप्शनही दिलं आहे. यात ती म्हणते, “फेब्रुवारी २०२१ Vs एप्रिल २०२१.”अनेक सेलिब्रिटींनी आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी, चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी तिची तुलना कराटे किड या चित्रपटातल्या लहान मुलाशी केली तर काही जणांनी तिला डॉन, गँगस्टर असंही म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

एक युजर म्हणाली, ‘गँगस्टर गुप्ता’ ज्याला मसाबाने ‘रिलक्टंट गँगस्टर’ म्हणत रिप्लायही दिला आहे. तर अजून एका युजरने ‘डॉन’ अशी कमेंटही केली आहे.अभिनेत्री अमृता सुभाषनेही आपल्याला हा फोटो आवडल्याचं कमेंटमधून सांगितलं आहे. तर तिच्या अनेक चाहत्यांनी तिला कराटे किडमधला जेडन स्मिथ म्हटलं आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, आम्हाला मसाबाला वेण्यांमध्ये पाहायचं आहे.

मसाबा आपले लहानपणीचे फोटो कायम शेअर करत असते. तिने नुकतंच पांढरा आणि लाल फ्रॉकमधला एक फोटोही शेअर केला होता. त्या फोटोमधल्या तिच्या एक्स्प्रेशन्सवरुन तिने विनोदी कॅप्शनही दिलं होतं. या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “जेव्हा तुम्ही खूप फँटा पिलेला असतो आणि तुमच्या नाकपुड्या तुमच्या डोळ्यांपेक्षा जास्त कृत्रिम दिसत असतात.” तिची आई आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांनी या फोटोवर कमेंटही केली होती. ज्यात त्या म्हणत होत्या, “तू खरंच खूप विनोदी आहेस माझ्या बाळा!”. तर शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनेही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

नीनानेही मसाबाच्या लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. मार्चमध्ये मसाबाने तिच्या आई वडिलांसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. ती माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आहे. मसाबा एक उत्तम डिझायनर आहे आणि तिने ‘मसाबा मसाबा’ या आपल्या आयुष्यावर आधारित नेटफ्लिक्सच्या चित्रपटात प्रमुख भूमिकाही साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 3:36 pm

Web Title: masaba gupta shared her childhood pic fans compared her with jaden smith vsk 98
Next Stories
1 ‘आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…’, मुलाच्या आत्महत्येवर कबीर बेदींचा खुलासा
2 ‘आर्मी ऑफ द डेड’मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये एण्ट्री; दमदार ट्रेलर रिलीज
3 ‘माझ्याशी पंगा घेऊ नका’, रुबिनाचा फोन नंबर लीक होताच पती संतापला
Just Now!
X