News Flash

लेबनान स्फोट : अत्यंत धक्कादायक घटना; शिल्पा शेट्टीने व्यक्त केली हळहळ

दुहेरी स्फोटांच्या घटनेनंतर मनोरंजनसृष्टीतून मृतांना श्रद्धांजली

मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या भीषण स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. या घटनेवर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेला विनाशकारी म्हणत तिने तेथील लोकांसाठी दु:ख व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार; केंद्रानं शिफारस स्वीकारली

“ही एक अत्यंत दुदैवी घटना आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. तसंच जखमी लोकांनी लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी ईश्वराकडे प्रार्थना.” अशा आशयाचं ट्विट करुन शिल्पा शेट्टीने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य पाहा – राम मंदिर आणि भाजपाचा अजब योगायोग; शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखवलं ते दुर्मिळ नाणं

बैरूटमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले. अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधूस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. आधी मृतांचा आकडा ७० तर जखमींचा आकडा २७५० असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हा आकडा वाढून चार हजारहून अधिकजण जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 4:50 pm

Web Title: massive blast in beirut lebanon shilpa shetty mppg 94
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकरण : CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारताच अंकिता लोखंडेने केलं ‘हे’ ट्विट
2 सुशांत मृत्यू प्रकरण: मुंबई महापालिकेनं पाटणा पोलीस महानिरीक्षकांची मागणी फेटाळली
3 Video : अनिल कपूर यांचा आलिशान बंगला पाहा आतून
Just Now!
X