दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या फार्महाऊसला शुक्रवारी भीषण लागली. या आगीत ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाच्या सेटचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचं हे नुकसान आहे. हैदराबादमधील कोकपेट गावात चिरंजीवी यांचा फार्महाऊस आहे. याच फार्महाऊसच्या परिसरात चिरंजीवी यांच्या आगामी चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. सुदैवाने सेटवर कोणीच उपस्थित नसल्याने जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी बिग बी येथे शूटिंग करणार होते. मात्र आगीच्या घटनेमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आली आहे.
शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं, तोपर्यंत सेटचा बराच भाग आगीत जळून खाक झाला होता. ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाच्या सेटला दुसऱ्यांदा आग लागली आहे. याआधी नोव्हेंबर २०१७ मध्ये जेव्हा हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओ येथे शूटिंग सुरू होती, तेव्हासुद्धा आग लागल्याची घटना घडली होती.
Massive fire in megastar #Chiranjeevi's farmhouse in Kokapet on the outskirts of #Hyderabad where shooting for #SyeraaNarasimhareddy is on. Fire erupted because of short circuit. Luckily, no one was injured as it was on off day. @SrBachchan pic.twitter.com/vsIIJBjpZI
— krishnamurthy (@krishna0302) May 3, 2019
चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये नयनतारा, विजय सेतुपती, तमन्ना आणि सुदीप यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 3, 2019 1:37 pm