दाक्षिणात्य सुपस्टार विजय सेतुपतिचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन पंधरा दिवस झाले आहेत. करोना काळात चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊनही चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने धूमाकुळ घातला असून चित्रपटाची जादू कायम असल्याचे पहायला मिळते.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आता चित्रपटाने चेन्नईमध्ये १० कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. तर तामिळनाडू येथे चित्रपटाने ११५ कोटी रुपये कामवाले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर हा चित्रपट पोहोचला आहे.

मास्टर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुफान कमाई केली होती. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपटाने ११.३ कोटी रुपयांची कमाई केली होती. तामिळनाडूमध्ये ४९ कोटी रुपये, केरळमध्ये ४.१ कोटी रुपये आणि ५ कोटी रुपये कमाई कर्नाटकमध्ये केली. इतर ठिकाणाहून जवळपास १ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली होती. त्यामुळे मास्टर चित्रपटाने जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई पहिल्याच आठवड्यामध्ये केली होती.

आणखी वाचा : करोना काळातही बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘मास्टर’ होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.