नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मास्टर’ चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. करोना काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटाने जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

फिल्मी बिटने दिलेल्या वृत्तानुसार, मास्टर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुफान कमाई केली आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपटाने ११.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तामिळनाडूमध्ये ४९ कोटी रुपये, केरळमध्ये ४.१ कोटी रुपये आणि ५ कोटी रुपये कमाई कर्नाटकमध्ये केली आहे. इतर ठिकाणाहून जवळपास १ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. त्यामुळे मास्टर चित्रपटाने जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आणखी वाचा- ‘अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का?’ कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल

‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी दोन आठवड्यांपूर्वी मास्टर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा- शूटिंगदरम्यान आलियाची प्रकृती बिघडली, करण्यात आले होते रुग्णालयात दाखल

‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.