लॉकडाउनमुळे बंद असलेली सिनेमागृह आता हळूहळू पुन्हा सुरु होऊ लागली आहेत. अलिकडेच ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन १९८४’ या हॉलिवूडपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लक्षवेधी बाब म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारोंच्या संख्येनं सिनेमागृहाबाहेर गर्दी केली. या गर्दीनं लॉकडाउनच्या नियमांचं देखील उल्लंघन केलं. सिनेमागृहाबाहेर झालेल्या गर्दीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

राज्यात दिवसभरात नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा दीडपट अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी तो तितका धोकादायक नसल्याने चिंतेची बाब नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात २,४३८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४,२८६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १९,७१,५५२ इतकी झाली असून आजवर १८,६७,९८८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत ५०,१०१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या ५२,२८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.