लॉकडाउनमुळे बंद असलेली सिनेमागृह आता हळूहळू पुन्हा सुरु होऊ लागली आहेत. अलिकडेच ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन १९८४’ या हॉलिवूडपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लक्षवेधी बाब म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारोंच्या संख्येनं सिनेमागृहाबाहेर गर्दी केली. परंतु आवडत्या अभिनेत्यासाठी ही गर्दी करणं चाहत्यांना भारी पडलं आहे. पोलिसांनी लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या सर्व प्रेक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
#Master is here! Let’s dance like #Vijay fans! | @koushiktweets
Follow all the latest updates about #MasterFDFS here: https://t.co/Omxt4U2JPd pic.twitter.com/9WUjKqJmun
— Indian Express Entertainment (@ieEntertainment) January 13, 2021
सिनेमागृहाबाहेर झालेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या गर्दीतील अनेक लोकांनी आपल्या तोंडावर मास्क देखील घातलेला नाही. परिणामी काही प्रमाणात नियंत्रणात आलेला करोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियम मोडणाऱ्या प्रेक्षकांविरोधात कडक पाऊल उलण्याचा निर्णय घेतला आहे.
#MasterPongal it is. The fans are on festival mood. @ieEntertainment @IndianExpress pic.twitter.com/PMDrf7e10x
— Janardhan Koushik (@koushiktweets) January 12, 2021
राज्यात दिवसभरात नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा दीडपट अधिक अॅक्टिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी तो तितका धोकादायक नसल्याने चिंतेची बाब नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात २,४३८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४,२८६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १९,७१,५५२ इतकी झाली असून आजवर १८,६७,९८८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत ५०,१०१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या ५२,२८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 4:32 pm