29 May 2020

News Flash

घरकामातही अमेय आहे वाघ; देतोय झाडू, लादी आणि भांडी घासण्याचं प्रशिक्षण

ZLB चं फुकट प्रशिक्षण घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा...

लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळलेल्या लोकांनी वेळ घालवण्यासाठी आता विविध प्रकारचे कोर्स करण्यास सुरुवात केली आहे. असाच एक चकित करणारा कोर्स अभिनेता अमेय वाघने केला आहे. या स्पेशल कोर्सला त्याने ‘मास्टर इन घरकाम’ असं नाव दिलं आहे. हे खास प्रशिक्षण घेत असताना त्याला काय काय अनुभव आले हे त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहेत.

अवश्य पाहा – इतकी भीती! कसलं जीवन जगत आहात; पाकिस्तान विमान अपघातावरून अभिनेत्याचा बॉलिवूडला सवाल

अमेय वाघ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तो घरकाम कसं कराययं हे शिकवत आहे.

मास्टर इन घरकाम या कोर्समध्ये अमेयला ZLB हे तीन विषय शिकवले गेले. Z – म्हणजे झाडू मारणे, L – म्हणजे लादी पुसणे, आणि B – म्हणजे भांडी घासणे. झाडू, भांडी आणि लादी कशी पुसायची याबाबत सखोल माहिती अमेयने या व्हिडीओमधून दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर आपल्या गंमतीशीर शैलीत या व्हिडीओसाठी अमेयचे आभार देखील मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 3:24 pm

Web Title: master of gharkaam vishay asa ahe amey wagh kshitij patwardhan mppg 94
Next Stories
1 “ही घटना पाहून धैर्य संपलं”; पाकिस्तान विमान अपघातामुळे अभिनेत्री भावूक
2 निधनाच्या अफवांवर मुमताज यांचं स्पष्टीकरण; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या..
3 पडद्यावरचा खलनायक, प्रत्यक्ष आयुष्यात हिरो ! जयंत पाटलांकडून सोनू सुदचं कौतुक
Just Now!
X