22 November 2017

News Flash

PHOTOS : ईशा देओलचे ‘मॅटर्निटी फोटोशूट’

ग्रीसमध्ये ईशाने केले 'मॅटर्निटी फोटोशूट'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 7:14 PM

इशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी

अभिनेत्री ईशा देओल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. आपले अनेक फोटो ती चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. यावेळी ईशाने ‘मॅटर्निटी फोटोशूट’मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. पती भरत तख्तानीसोबत काढलेले ईशाचे हे फोटो पाहून तुम्हीसुद्धा स्तुती केल्याशिवाय राहणार नाही.

ग्रीसमध्ये ईशा आणि भरत यांनी हे फोटोशूट केले. लग्नाचा ५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे बेबीमूनसाठी दोघे ग्रीसला गेले होते. सुप्रसिद्ध फोटोग्राफर Dimitris Psillakis ने ईशाचे ‘मॅटर्निटी फोटोशूट’ केले असून सोशल मीडियावर या फोटोंना खूप लाईक्स मिळत आहेत.

esha-deol-1

esha-deol-2

वाचा : बॉलिवूड पदार्पणाबाबत मीराचा सर्वात मोठा खुलासा!

सकाळी ६ वाजता हा फोटोशूट असल्याने कपडे, मेकअपपासून सर्व तयारी स्वत: ईशाने केली आहे. या अनुभवाबद्दल सांगताना ईशा म्हणाली की, ‘मला समुद्रकिनारा खूप आवडतो. ग्रीसमध्ये भरतसोबत फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरलाय. मला घरच्या जेवणाची खूप आठवण आली, मात्र भरतला इथले सागरी खाद्यपदार्थ खूप आवडले.’ या वर्षाअखेर ईशा आई बनणार असून हेमा मालिनीने नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारीसुद्धा सुरु केली आहे.

First Published on July 17, 2017 7:14 pm

Web Title: maternity photoshoot of esha deol and bharat takhtani