सनी लिओनी सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणेच सक्रिय असते. सध्या ती तिच्या आगामी सिनेमासाठी मॉरिशसला गेल्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती अरबाज खानसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. सनी आणि अरबाज खान हे दोघे प्रथमच राजीव वालिया यांच्या ‘तेरा इंतजार’ या म्युझिकल रोमॅण्टिक सिनेमासाठी एकत्र आले आहेत. या सिनेमाच्या दुसऱ्या सत्राचे चित्रीकरण मॉरिशस येथे सुरु झाले आहे.

या सिनेमाची ही हटके जोडी पाहून याचे नक्की कथानक असणार तरी काय असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. या सिनेमाचे काही फोटो अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोत अरबाज आणि सनी एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोतून सनी व अरबाजचा सिनेमातील लुकही चाहत्यांना पाहायला मिळतोय. या दोघांनी ‘कच्छ’ येथे २५ दिवसांचे सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. आता पुढील चित्रिकरणासाठी ते मॉरिशसला गेले आहे.

अरबाज काही दिवसांपूर्वी पत्नी मलायका अरोरा खान हिच्यासोबतच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे चर्चेत होता. आता मात्र त्याने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे.