01 October 2020

News Flash

दहा वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून गायब झालेली ही अभिनेत्री आता ‘गुगल’मध्ये मोठ्या पदावर

१९९६ साली प्रदर्शित झालेला 'पापा कहते हैं' हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल.

‘पापा कहते हैं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगो गुगल इंडियाची उद्योगप्रमुख झाली आहे. यापूर्वी मयुरीने परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर या पदाची धुरा सांभाळली होती. www.afaqs.com या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या नव्या व्यावसायिक वाटचालीविषयी माहिती दिली.

१९९६ साली प्रदर्शित झालेला ‘पापा कहते हैं’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटामध्ये मयुरीने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याकाळी तिचे असंख्य चाहते झाले होते. या चित्रपटातील ‘घर से निकलते’ ही या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली होती. मात्र इतकी लोकप्रियता मिळवूनही तिचा बॉलिवूडमध्ये म्हणावा तसा वावर दिसून आला नाही.

‘पापा कहते है’ नंतर तिचा ‘होगी प्यार की जीत’ हा एकमेव चित्रपट तिकीटबारीवर गाजला त्यानंतर तिचे नंतरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर तिने तिचा मोर्चा तमिळ चित्रपट व छोट्या पडद्यावरील मालिकांच्या दिशेने वळवला. परंतु तेथेही तिला काही विशेष यश संपादित करता आले नाही. अथक प्रयत्न करुनही सातत्याने हाती येणारे अपयश पाहून शेवटी मयुरीने अभिनयक्षेत्राला कायमचा रामराम ठोकला.

अभिनय सोडल्यानंतर न्यूयॉर्कमधील ३६० आय या डिजीटल एजन्सीमध्ये ती नोकरी करु लागली. त्यानंतर त्याच कंपनीत तिला मीडिया मॅनेजर या पदावर बढती मिळाली. त्यानंतर तिने परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केले. आणि आता तर ती थेट गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 2:28 pm

Web Title: mayoori kango of publicis moves to google india as industry head agency business
Next Stories
1 रणवीर सिंग साकारणार फिल्ड मार्शल सॅम माणेकशा?
2 तुमचे मनापासून आभार, इरफानची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट
3 ‘दबंग ३’चे शूटिंग सुरू होताच टायटल ट्रॅकचा व्हिडिओ लीक
Just Now!
X