News Flash

..म्हणून ‘या’ मराठी अभिनेत्रीला डॉक्टरांनी दिलं ‘करोना’ औषध

गोळ्यांच्या पाकिटावर 'करोना' हे नाव बघून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय.

अभिनेत्री गौतमी देशपांडे

‘माझा होशील ना’ मालिकेत सईची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चर्चेचं कारण म्हणजे तिने पोस्ट केलेला ‘करोना’ गोळ्यांच्या पाकिटाचा फोटो. या फोटोमधील गोळ्यांच्या पाकिटावर ‘करोना’ हे नाव बघून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय.

‘जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला ‘करोना’ नावाचं औषध देतो… मी खूश होऊ की घाबरू?’, असं गौतमीने या पोस्टमध्ये लिहिलंय. गौतमीने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केलेला हा फोटो पाहून तिला करोना विषाणूची लागण झाली की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला. गौतमीला ताप व सर्दी झाल्याचीही चर्चा झाली. मात्र तिने त्यापुढील पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, ‘मला ताप किंवा सर्दी झाली नाही. हे फक्त व्हिटामिनचे टॅब्लेट आहेत आणि त्या टॅब्लेटचं नाव करोना आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका.’

आणखी वाचा : ‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्यानंतर नेहा धुपिया म्हणते.. 

गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. गौतमी सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत सईची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिच्यासोबत विराजस कुलकर्णी, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार आणि बिग बॉस मराठीचे माजी स्पर्धक विद्याधर जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 12:09 pm

Web Title: maza hoshil na actress gautami deshpande suffers from fever quips about her medicine named corona ssv 92
Next Stories
1 Coronavirus : “जलसासमोर गर्दी करु नका”; बिग बींचे चाहत्यांना आवाहन
2 ‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्यानंतर नेहा धुपिया म्हणते..
3 Coronavirus : हिंदू महासभेच्या ‘गोबर पार्टी’वर अनुराग कश्यपने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
Just Now!
X