News Flash

आदित्य देणार सईला खास सरप्राईज, ‘माझा होशील ना’मध्ये रंजक वळण

रविवारी दोन तासाचा खास भाग

‘माझा होशील ना’ या मालिकेतील सई आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी घडत आहेत आणि ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. मालिका इरसाल ब्रह्मे मामा आणि सई-आदित्यचं प्रेम यामुळे चांगलीच लोकप्रिय आहे. लग्नानंतर सई आता तिच्या चार सासऱ्यांसोबत, एका आज्जेसासऱ्यासोबत आणि नवरोबा आदित्यसोबत मजेत राहू लागलीये. आता तर तिने ब्रह्मे घराला गुलप्रीतच्या रुपात नवीन सुनबाईही मिळवून दिलीये.

पण या साऱ्या घटनांच्यामधे सई-आदित्यला स्वत:साठी वेळच काढता येत नाहिये. त्यामुळेच या रविवारी दोघांनी सिनेमाला जायचा प्लान केलाय! आदित्यने सईसाठी हा खास सिनेमाचा बेत आखलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सई-आदित्य मिळून एका आटपाट नगरीच्या निरागस राजकुमाराची आणि बिनधास्त राजकुमारीची गोष्ट पाहणार आहेत आणि आजवर न झालेले अनेक खुलासे या सिनेमाच्या निमित्ताने होणार आहेत. तेव्हा या रविवारी हा दोन तासाचा खास भाग दाखवला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 11:30 am

Web Title: maza hoshil na serial update avb 95
Next Stories
1 ‘अमित कुमार यांना शो आवडला नव्हता तर..’, इंडियन आयडलमधील ‘त्या’ वादावर अभिजीत सांवतची प्रतिक्रिया
2 Video : वडिलांच्या मृत्यूसाठी रुग्णालय जबाबदार, सगळे डॉक्टर देव नसतात- संभावना सेठ
3 ‘संदीप और पिंकी फरार’वर प्रेक्षक फिदा; सोशल मीडियावर परिणीती अर्जूनचं होतंय कौतुक
Just Now!
X