किताबखान्यामध्ये आतापर्यंत आवडत्या पुस्तकांविषयी कलाकार भरभरुन बोलले. त्यामुळे सर्वच कलाकार पुस्तकं वाचण्यास सर्वाधिक प्राधान्य देतात असाच समज बळावत असताना या सदरातून सर्वांसमोर आली अभिनेत्री अभिज्ञा भावे. किताबखाना किंवा साठवणुकीतील पुस्तकं अशा कोणत्याच संकल्पनेशी बांधिल नसलेली अभिज्ञा इतरांकडून मागून किंवा पुस्तकं विकत घेते आणि अर्थात आपली वाचनाची आवड जोपासते. एक कलाकार म्हणून तिचा सर्वाधिक कल हा दर्शनीय म्हणजेच व्हिज्युअल माध्यमाकडे जास्त आहे. त्यामुळे ‘माझा किताबखाना’ या सदरासाठी अभिज्ञा सहकार्य करणार की नाही…. असे वाटत असतानाच तिने सध्या तिच्या वाचनात असलेल्या पुस्तकाचा उल्लेख केला. या पुस्तकाविषयी सांगताना वाचन, पुस्तकं आणि आयुष्य याचा सुरेख मेळ साधत अभिज्ञाने तिच्या आवडत्या पुस्तकाचा उलगडा केला.

abhidnya-bhave-670

savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

आवडत्या पुस्तकाचा विषय निघताच ‘अ माँक व्हू सोल्ड हीज फेरारी’ आणि ‘मेनी लाइफ मेनी मास्टर्स’ या पुस्तकांचा उल्लेख तिने केला. मुळातच फिलॉसॉफिकल वाचण्याची आवड असल्यामुळे अभिज्ञाने या पुस्तकांना आवडत्या पुस्तकाचे स्थान दिले आहे. याविषयी सांगताना अभिज्ञा म्हणाली, ‘तुमच्याकडून ज्या प्रकारचा प्रतिसाद इतरांना दिला जातो तोच इतरांकडून परत तुम्हालाही मिळतो. हे एक प्रकारचे चक्रच आहे. त्यामुळे ‘अ माँक व्हू सोल्ड हीज फेरारी’ हे पुस्तक वाचत असताना माझ्या एक लक्षात आलं की, जर कोणत्याही बाबतीत नकारात्मक विचार केला तर ती गोष्ट नकारात्मकच घडणार. पण, त्याऐवजी जर का सकारात्मक विचार केला, आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन नेहमीच सकारात्मक ठेवला तर एक प्रकारची वेगळी, सकारात्मक ऊर्जा तुम्हीही अनुभवू शकता. ‘अ माँक…’ वाचताना असाच काहीसा अनुभव मला आला. त्यामुळे या पुस्तकांतून मी बरंच काही शिकले आहे, असे अभिज्ञा म्हणाली.
पुस्तकांच्या निवडीविषयी सांगताना अभिज्ञा म्हणाली, माझी पुस्तकं निवड करण्याची पद्धत फार वेगळी आहे. मी फार ठराविक प्रकारचीच पुस्तकं वाचते. त्यातही फिलॉसॉफिकल विषयांवर आधारित पुस्तकं वाचण्याला मी प्राधान्य देते. मराठी पुस्तकांच्या तुलनेत इंग्रजी पुस्तकं जास्त प्रमाणात वाचणाऱ्या अभिज्ञाने तिच्या आणखी एका आवडत्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीने अभिज्ञालाही भुरळ घातली आहे. खरंतर माझ्या आईमुळे मला या पुस्तकाबद्दल अभिरुची वाटू लागली असे तिने स्पष्ट केले. त्यामुळे या हटके अभिनेत्रीच्या किताबखान्यात डोकावले असता तिची एकंदर वाचनाची आवड आणि त्यातून उलगडत जाणाऱ्या गोष्टी पाहता तिला ‘फिलॉसॉफिकल रिडर’ म्हणण्यात काहीच गैर नाही..

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com