News Flash

‘मृत्युंजय’मधील व्यक्तिरेखांचं चित्रण मला भावलं -लीना भागवत

या पुस्तकाच्या निमित्ताने दुर्योधनाची एक वेगळी बाजू सर्वांसमोर आली

लीना भागवत

‘माझा किताबखाना’ या सदरातील आपल्या पुढच्या अभिनेत्रीची नव्याने कोणतीही ओळख करुन देण्याची गरजच नाहीये. या अभिनेत्रीचा बोलका स्वभाव आणि व्यासपीठावर, पडद्यावर असणारा तिचा वावरच सर्वांना लीन करतो….आणि ही अभिनेत्री म्हणजे लीना भागवत. लीना भागवत यांच्या किताबखान्याविषयी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एक अभिनेत्री म्हणून त्या जितक्या हरहुन्नरी आहेत तितक्याच एक वाचक म्हणूनही त्या उत्साही आहेत. चला तर मग, डोकावूयात लीना भागवत यांच्या किताबखान्यात..

पु.लं., वपु, शांताबाई यांसारख्या लेखकांची नावं घेत मी कोणा एका लेखकाला फॉलो करत नाही हे लीना भागवत यांनी स्पष्ट केलं. पण, त्यांच्या या किताबखान्यातील एका खास पुस्तकाचाही त्यांनी न विसरता उल्लेख केला.
शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या पुस्तकाविषयी सांगताना लीना भागवत म्हणाल्या, ‘त्या पुस्तकामध्ये व्यक्तिरेखांचं केलेलं चित्रण मला फारच आवडलं. मला त्या पुस्तकातील कर्णाची व्यक्तिरेखा तर आवडलीच पण म्रुत्युंजयमध्ये व्रुषालीचे केलेले चित्रण आणि तिच्या पात्रासाठी लिहिलेला भाग फार आवडला. ‘मृत्युंजय’ या पुस्तकामधून दुर्योधनाचीही एक वेगळीच बाजू सर्वांसमोर आली’, असे लीना भागवत म्हणाल्या. पुस्तक माझ्यासाठी एक रिलॅक्सेशन आहे असेही त्या म्हणाल्या. किशोर, चांदोबा, इसापनिती यांपासून ते अगदी विविध प्रकारची मासिकं आणि पुस्तकं वाचण्याला लीना भागवत प्राधान्य देतात. आवडत्या पुस्तताविषयीचा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ‘आवड, विचार, समज यांसोबतच पुस्तकांबद्दलची आवडही बदलतेच, आणि त्यात वावगं काहीच नाही’.

पुस्तकं आणि वाचनाविषयी बोलताना लीना भागवत यांनी आजच्या पिढीमध्ये वाचनाची आवड फार कमी झाली असल्याची खंतही व्यक्त केली. युरोपियन लेखकांविषयी मत मांडताना लीना भागवत यांनी एक सुरेख विचार मांडला. फक्त फॅड म्हणून युरोपियन लेखकांची पुस्तकं वाचण्यापेक्षा त्यांच्या कलेचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांची पुस्तकं वाचा, असं मत त्यांनी मांडलं.

वाचनाच्या आवडीविषयी सांगताना लीना भागवत म्हणाल्या, ‘नाटक, मालिका, सिनेमा यांपैकी कशात काम करायला आवडेल असं जर मला कोणी विचारलं तर माझं उत्तर असेल की मला अभिनय आवडतो. त्याचप्रमाणे हातात पुस्तक पकडून वाचन करायला आवडतं की अॅप्स, किंडलवर पुस्तक वाचायला आवडतं असं जर मला कोणी विचारलं तर माझं उत्तर असेल मला वाचन आवडतं’. वाचन… वाचन असतं. मग ते कसंही असो…

अशा प्रकारे हा होता अभिवाचनापासून ते अगदी व्रुत्तपत्रातील सदरापर्यंत सर्व प्रकारच्या लेखनसाहित्याचे मनमुराद वाचन करणाऱ्या अभिनेत्री लीना भागवत यांचा किताबखाना…पुढच्या वेळी किताबखान्याच्या नव्या पानावर कोणत्या कलाकाराची आणि पुस्तकाची भेट घडणार हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा माझा किताबखाना.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com

leena-bhagwat-marathi-actress

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 9:26 am

Web Title: maza kitaabkhana column on celebrities favorite books leena bhagwat
Next Stories
1 PHOTO: ‘फर्स्ट लेडी ऑफ बॉलिवूड’सह किंग खान फोटोसाठी पोझ देतो तेव्हा..
2 कथा पोलिसांच्या शोधाची आणि हुशारीची
3 सेलेब्रिटी लेखक : आजोबांच्या कास्टिंगमुळे श्रीगणेशा!
Just Now!
X