‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील अभिनेता अभिजीत खांडकेकर अपघातातून थोडक्यात बचावला. रविवारी २५ नोव्हेंबर रोजी शूटिंगला जाताना हा अपघात झाला. आपल्या कारमधून शूटिंगसाठी जाताना समोरील ट्रकमधून धातूचा पाईप अभिजीतच्या कारच्या दिशेने घरंगळत आला. सुदैवाने या अपघातात अभिजीला कोणतीही दुखापत झाली नाही.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने घडलेला प्रसंग सांगितला. ‘शूटिंगसाठी जात असताना मिरा-भाईंदर पुलावर हा अपघात झाला. माझ्या कारसमोरील ट्रक धातूचे मोठमोठे पाईप वाहून नेत होती. त्यातील एक पाईप माझ्या कारच्या दिशेने घरंगळत आली. माझ्या कारची समोरील काच पूर्णपणे तुटली आणि तो पाईप पुलाखाली पडला. पुलाखाली असलेल्या कोणावर तो पाईप पडू नये याची मला फार काळजी होती. सुदैवाने मला कोणतीही दुखापत झाली नसून फक्त माझ्या कारचं नुकसान झालं,’ असं त्याने सांगितलं. अभिजीतने त्याच्या कारचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले होते.
वाचा : बॉक्स ऑफीसवर नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ची गाडी सुसाट
अभिजीत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत गुरुनाथ सुभेदार ही भूमिका साकारत आहे. छोट्या पडद्यावरील ही मालिका अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 4:44 pm