News Flash

गुरुनाथला महागात पडणार ‘माया’जाल; राधिका-शनायाने आखला नवा डाव

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गेल्या चार वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. टीआरपीच्या यादीतही ही मालिका इतर मालिका व कार्यक्रमांना चांगली टक्कर देते. आता या मालिकेच्या कथानकात नवीन वळण येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या टीझरमध्ये राधिका व शनाया एकत्र येताना दिसत आहेत.

या टीझरमध्ये शनाया रडत रडत राधिकाकडे येते. ‘तुमच्या आणि गॅरीच्या आयुष्यात जशी मी आली, तशी आता माझ्या आणि गॅरीच्या मध्ये ती माया आली आहे. तो मलासुद्धा सोडून जाईल’, असं शनाया म्हणते. त्यानंतर राधिका व शनाया एकत्र येऊन गुरुनाथला धडा शिकवण्याचं ठरवतात. सध्या सोशल मीडियावर याच टीझरची चर्चा असून ‘आता गुरुनाथचं काही खरं नाही’, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत.

पाहा फोटो : गुरुनाथला ‘माया’जालात अडकवणारी अभिनेत्री

आता राधिका व शनाया एकत्र आल्याने मालिकेचं पुढील कथानक फार रंजक होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. मालिकेत अभिजीत खांडकेकर गुरुनाथची भूमिका साकारत आहे तर अनिका दाते राधिकाच्या भूमिकेत आहेत. इशा केसकर शनायाची भूमिका साकारत असून रुचिरा जाधव मायाच्या भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 10:59 am

Web Title: mazhya navryachi bayko radhika and shanaya reunite for this reason ssv 92
Next Stories
1 कियारा अडवाणीची पाकिस्तानमध्येही क्रेझ; ‘या’ अभिनेत्रीने केली तिची कॉपी
2 Coronavirus : कोणी हात मिळवण्याचा प्रयत्न केल्यास करीना करते ‘हे’ काम
3 अश्लील गाण्यात घेतलं महात्मा गांधीजींचं नाव; गायिकेविरोधात FIR दाखल