26 January 2020

News Flash

राधिका सौमित्रला देणार लग्नासाठी होकार

राधिकाच्या या निर्णयावर काय असेल गुरूनाथची प्रतिक्रिया? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

झीमराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सध्या घराघरामध्ये पोहोचली आहे. ही मालिका टीआपरीच्या यादीमध्ये देखील नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. या मालिकेतील शनाया आणि गॅरीची जोडी जितकी चर्चेत असते तितकीच राधिका आणि सौमित्रची मैत्री रसिकांना पाहायला आवडते. आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

मालिकेत सौमित्र सर्वांना सोडून परदेशात कायमचा निघून जाणार असतो. त्याचा हा निर्णय ऐकून राधिकाला धक्काच बसतो. सौमित्रला निरोप देण्यासाठी गुलमोहर सोसायटीमधील सर्वजण जमा होतात. सौमित्रने त्याचा निर्णय राधिकाला अचानक सांगितल्याने राधिकाचे मन दुखावले जाते. दरम्यान सौमित्र सर्वांसमोर त्याचे राधिकावर प्रेम असल्याचे सांगतो. ते ऐकून राधिकाला धक्काच बसतो आणि ती सौमित्रकडे या गोष्टीचा विचार करण्यासाठी वेळ मागते. सौमित्र राधिकाला २४ तासांचा कालावधी देतो.

आजच्या भागामध्ये राधिका सौमित्रला होकार देणार देणार की गुरुनाथच्या भीतीने नकार देणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. खुद्द राधिकाने उर्फ अनिता दातारने ती सौमित्रला होकार देत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका सौमित्रला होकार देत असल्याचे पाहायला मिळत आहे. राधिकाचे हे उत्तर चाहत्यांसाठी सुखद धक्काच असणार आहे. परंतु राधिकाच्या या निर्णयावर काय असेल गुरूनाथची प्रतिक्रिया? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

First Published on August 14, 2019 1:19 pm

Web Title: mazhya navryachi bayko radhika get married to saumitra avb 95
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : पुन्हा रंगणार नवा खेळ, मेघा- रेशमची घरात एण्ट्री
2 निकच्या शर्टलेस फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली प्रियांका, म्हणाली..
3 साहो चित्रपटात महेश माजंरेकर दिसणार या भूमिकेत
Just Now!
X