News Flash

‘शनाया’ला लॉकडाउनने शिकवली ‘ही’ गोष्ट

ईशा केसकर लॉकडाउनचा काळ असा घालवतेय..

इशा केसकर

करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे आणि त्यामुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकारदेखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. या सुट्टीमध्ये कलाकारांना त्यांची आवड-निवड जोपासण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. हे कलाकार घरी त्यांचा वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

शनाया म्हणून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ईशा केसकरसाठी लॉकडाउनचा हा काळ म्हणजे थोडीशी हवीहवीशी वाटणारी सुट्टी आहे. एरवी मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे ज्या ज्या गोष्टी करता येत नाही त्या सगळ्या या सुट्टीत करून पाहायच्या आणि छोट्या-छोट्या गोष्टीतला भरभरून आनंद घेत पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागण्याची ऊर्जा यातून घ्यायची असं ईशा म्हणाली.

आणखी वाचा : सोनू सूदचा मुंबई लोकलचा पास सोशल मीडियावर व्हायरल

लॉकडाऊनमध्ये ईशा कसा वेळ घालवते हे विचारल्यावर ती म्हणाली, “लॉकडाऊनच्या काळात मी एक गोष्ट आवर्जून करते आहे ते म्हणजे कोणालाही कोणती अडचण आली तर मला जितकी मदत करता येईल तेवढी मी करते. चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनाही मी हे सांगते. उरलेल्या वेळात अगदी कमीत कमी आणि हाताशी असलेल्या वस्तूंमधून मला काय करता येईल ते प्रयत्न करते. माझ्या दोन मांजरी आहेत. त्यांच्याबरोबर खेळण्यात माझा खूप छान वेळ जातो. सध्या तरी मी पुन्हा एकदा चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट पाहाते आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 3:36 pm

Web Title: mazya navryachi bayko fame shanaya aka isha keskar learn this thing in lockdown ssv 92
Next Stories
1 दंगल गर्ल चटणी करायला गेली अन् थेट रुग्णालयात पोहोचली
2 ४२० रुपयांचा सोनू सूदचा १९९७ सालातील लोकल ट्रेनचा पास व्हायरल, कारण की…
3 पोलिसांच्या सुरक्षेसाठी भाईजानचा पुढाकार; , मुंबई पुलिसांसाठी दिले खास सॅनिटायझर
Just Now!
X