24 February 2021

News Flash

Video : ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट यांचं दृढ नातं एका वेगळ्या रूपात या चित्रपटातून समोर येणार आहे.

‘डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’ अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षित ‘मी पण सचिन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सचिन एका क्रिकेटरची भूमिका वठवत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट यांचं अगदी दृढ नातं आहे. हेच नातं एका वेगळ्या रूपात ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाच्या टॅगलाइनवरून ‘मी पण सचिन’ हा चित्रपट एक सकारात्मक संदेश देणार हे नक्की. स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नका, असा आशावादी विचार या चित्रपटातून व्यक्त होत आहे. एक सामान्य तरुण, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची मेहनत यांच्या जोरावर अशक्य वाटणारे त्याचे स्वप्न अप्रत्यक्षपणे कसे साकार करतो त्याची गोष्ट म्हणजे ‘मी पण सचिन’ हा चित्रपट.

गावात राहणारा एक तरुण, लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याची असणारी लढाई, हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. ट्रेलरमध्ये स्वप्नील तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन वेगवेगळ्या रूपात समोर येत आहे. या चित्रपटांमध्ये अनेक बड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.

इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आता श्रेयश जाधव चित्रपटांशी जोडले गेले असल्याने चित्रपटात नक्कीच काही तरी हटके पाहायला मिळणार हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 3:42 pm

Web Title: me pan sachin official trailer
Next Stories
1 पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटात अक्षय साकारणार खलनायक
2 ‘बाळासाहेब ठाकरेंना करायची होती तुमची हत्या’, यावर सोनू निगमने दिली ही प्रतिक्रिया
3 पूर्वकल्पना न देता ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमधून तापसीची गच्छंती
Just Now!
X