22 February 2019

News Flash

‘हाऊसफुल ४’ मधल्या इतरही कलाकारांनी ठोस भूमिका घ्या, ट्विकलंच आवाहन

अक्षयनं साजिदसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे इतर कलाकारांनीही ठोस भूमिका घ्यावी असं आवाहान ट्विंकल खन्नानं केले आहे.

अक्षयच्या निर्णयानंतर साजिद स्वत: दिग्दर्शन पदावरून पायउतार झाला.

#MeToo मोहीम आता बॉलिवूडमध्येही जोर धरू लागली आहे. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधल्या अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहेत. याव्यक्तींविरोधात बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी ठोस अशी भूमिका घेतली आहे. लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झालेल्या साजिद खानच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण अक्षयनं थांबवलं आहे. आता या चित्रपटातील अन्य कलाकारांनीदेखील अक्षयसारखीच ठोस भूमिका घ्यावी असं आवाहान अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नानं केले आहे.

‘काही दिवसांपासून मी लैंगिक गैरवर्तणुकीच्या अनेक घटना वाचल्या. पीडित महिलांना कोणत्या मानसिक धक्क्यातून जावं लागतंय याची कल्पनाही मला करवत नाहीये. हाऊसफुल ४ मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारानं आता या प्रकरणावर काहीतरी ठोस भूमिका घ्यालाच हवी. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’ असं ट्विट ट्विंकल खन्नानं आहे.

आपल्या ट्विटमधून तिनं इतर कलाकारांना यावर व्यक्त होण्याचं आवाहन केलं आहे. साजिद खान आणि नाना पाटेकर यांच्यावर असलेल्या लैंगिक वर्तणुकीच्या आरोपानंतर अक्षयनं निर्मात्यांना हाऊसफुल ४ चं चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. लैंगिक गैरवर्तणुक करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे अशा प्रकरणात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ असं अक्षय कुमारनं ट्विट केलं होतं.

अक्षयच्या निर्णयानंतर साजिद स्वत: दिग्दर्शन पदावरून पायउतार झाला. तसेच माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत असंही तो ट्विट करून म्हणाला होता.

First Published on October 12, 2018 4:16 pm

Web Title: me too twinkle khanna wants housefull 4 team to take a firm stance
टॅग MeToo