18 September 2019

News Flash

Video : पंचतारांकित हॉटेलच्या नाश्त्यात आढळल्या अळ्या; ‘कलंक’मधील अभिनेत्रीने उघड केला प्रकार

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या अळ्या स्पष्टपणे दिसत आहेत

बॉलिवूड कलाकार कामानिमित्त प्रत्येक वेगवेगळ्या शहरांना भेट देत असतात. त्यातच त्यांचं राहणीमान लक्झरी असल्यामुळे या शहरांमध्ये राहण्यासाठी ते कायम पंचतारांकित हॉटेलचीच निवड करतात. पंचतारांकित हॉटेल म्हटलं की लक्झरी सर्व्हिस आणि महागडी बिलं हे ओघाओघाने आलेच. मात्र या साऱ्यामध्ये या हॉटेल्सची निगेटीव्ह बाजू कायम झाकली जाते. काही दिवसापूर्वी अभिनेता राहूल बोसला या पंचतारांकित हॉटेल्सच्या निष्काळजीपणाचा चांगलाच प्रत्यय आला होता. त्याला २ केळ्यांसाठी ४४२ रुपये मोजावे लागले होते. त्यानंतर एका अभिनेत्रीलाही या हॉटेल्सचा फटका बसला आहे. तिच्या जेवणामध्ये चक्क जिवंत अळ्या सापडल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीरा चोप्रा काही दिवसापूर्वी अहमदाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबली होती. या हॉटेलमध्ये तिने सकाळी नाश्ता ऑर्डर केला होता. या नाश्ताच्या प्लेटमध्ये तिला चक्क वळवळणाऱ्या अळ्या आढळून आल्या.

“मी सध्या अहमदाबादमधील डबल ट्री हेल्टन हॉटेलमध्ये थांबले आहे. आज सकाळी मी नाश्ता मागवला आणि त्यासोबतच मला जिवंत अळ्या मिळाला. आपण चांगलं रहायला मिळावं म्हणून एवढे पैसे मोजतो. मात्र त्या बदल्यात हे लोक खाण्याच्या पदार्थांमध्ये किडे, अळ्या देतात. मला वाटतंय की, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, कृपया हे ट्रेंड करा, ज्यामुळे हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल”, असं कॅप्शन देत मीराने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

वाचा : ‘दोन घडींचा डाव’, राखी सावंतचा संसार मोडला?

दरम्यान, अभिनेत्री मीरा चोप्रानं २००५ मध्ये तमिळ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये तिने ‘गँग ऑफ घोस्ट’ या चित्रपटातून बॉलिवूड काम केलं. त्यानंतर मीरानं ‘1920 लंडन’ आणि करण जौहरच्या ‘कलंक’ चित्रपटात काम केलं. विशेष म्हणजे ती लवकरच ‘सेक्शन 375’ मध्ये दिसणार आहे.

First Published on August 25, 2019 3:19 pm

Web Title: meera chopra shared video of live worms in food staying in doubletree by hilton 5 star hotel ssj 93