News Flash

“घराणेशाहीची खरी शिकार मी झाले”; अभिनेत्रीने कंगनावर केला राजकारणाचा आरोप

जयललितांची भूमिका माझ्याऐवजी कंगना रनौतला कशी मिळाली?

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक स्टार किड्सवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. टीकाकारांमध्ये अभिनेत्री कंगना रनौत सध्या आघाडिवर आहे. ती सातत्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधत आहे. मात्र या दरम्यान दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा मिथून हिने उलट टीका कंगनावर केली आहे. राजकारण केल्याशिवाय तिला ‘थलाइवी’ या चित्रपटात काम कसं मिळालं? असा प्रश्न तिने विचारला आहे. घराणेशाहीने खरा अन्याय कंगनावर नव्हे माझ्यावर केलाय असा आरोपही तिने केला आहे.

मीरा मिथून हिने ट्विटरद्वारे कंगनावर टीका केली. “खऱ्या घराणेशाहीची शिकार तर मी झाले आहे. कंगना तुझ्याकडे असा कोणता गुण होता ज्यामुळे तुला जयललिता यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली? तू राजकारण करुन इथपर्यंत पोहोचली आहेस. ही भूमिका तू निट सादरही करु शकणार नाहीस.” अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे. मीरा मिथून हिने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मीरा मिथून एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. २०१७ साली ‘थोताक्कल’ या चित्रपटातून तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘थाना सेरंधा खुथ्थम’ या चित्रपटात ती झळकली होती. तिने एका गुजराती चित्रपटातही काम केलं आहे. बिग बॉस तमिळ या रिअॅलिटी शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 6:50 pm

Web Title: meera mithun criticised kangana ranaut for thalaivi movie mppg 94
Next Stories
1 कार्तिकीचं यंदा कर्तव्य आहे! साखरपुडा ठरला
2 सुपरहिरो ‘थॉर’ होणार हल्क होगन; WWE रिंगमध्ये करतोय सराव
3 कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का? फोटो होतोय व्हायरल
Just Now!
X