05 March 2021

News Flash

अली जफरने केला छळ; पाकिस्तानी गायिकेने मानहानीपोटी मागितले दोन अब्ज रूपये

याआधीही मीशाने अलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता.

मीशा शफी, अली जफर

अभिनेता व गायक अली जफरविरोधात पाकिस्तानी गायिका मीशा शफीने मानसिक छळाचा आरोप करत २ अब्ज रुपयांचा मानहानिचा दावा केला आहे. याआधीही मीशाने अलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. मात्र कोर्टाने तिचा खटला फेटाळून लावला.

‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी १ अब्ज व मानसिक छळासाठी १ अब्ज रुपयांचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे अली जफरने तिच्याविरोधात केलेले विधान चुकीचे व बदनामकारक असल्याचे कोर्टाने जाहीर करावे अशीही मागणी तिने केली आहे. याआधी जफरने मीशाचे आरोप फेटाळत तिच्याविरोधात १ अब्ज रुपयांचा मानहानीचा दावा केला होता. लाहोरच्या सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे.

एप्रिल २०१८ मध्ये मीशाने जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. मीशाच्या या आरोपांनंतर अलीवर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्याउलट अलीने मीशावर अब्रुनुकसानीचा दावा ठाकला होता. ‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून मीशाने माझी जाहीर माफी मागावी अन्यथा माझी प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी’, असे यापूर्वी अलीने पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले होते. मात्र तरीदेखील मीशाने या नोटीसला उत्तर न दिल्यामुळे अखेर अलीने मीशावर १०० कोटी रुपयांचा दावा ठोकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 11:38 am

Web Title: meesha shafi files rs 2 billion defamation lawsuit against ali zafar for causing mental torture ssv 92
Next Stories
1 Video : ‘इंडियन २’मुळे कमल हासन पोहोचले कारागृहात
2 अंगणवाडी सेविका ते करोडपती, बबिता यांचा थक्क करणारा प्रवास
3 ‘या नवरा बायकोला समजवा काहीतरी’; दीपवीरच्या कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Just Now!
X