News Flash

आदित्य बिर्ला ग्रुपच्या चेअरमनच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

अनन्याने तिच्या आई-वडिलांना एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली.

२२ वर्षांच्या अनन्याने १७व्या वर्षीच आपल्या आई-वडिलांच्या नावाचा आधार न घेता आपल्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता.

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम यांची मुलगी अनन्या बिर्ला हिने मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिच्या आवाजाची जादू चालवली. या कार्यक्रमात तिने गाणे म्हणून सर्वांना चकित केले. यावेळी हृतिक रोशन, सूरज पंचोली, दिनो मोरिया, सोहेल खान, विधू विनोद चोप्रा आणि राहुल बोस यांसारखे कलाकार उपस्थित होते. इतक्या कमी वयात अनन्याने केलेले सादरीकरण पाहून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. २२ वर्षांच्या अनन्याने १७व्या वर्षीच आपल्या आई-वडिलांच्या नावाचा आधार न घेता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने स्वतःची  मायक्रोफायनान्स कंपनी सुरु केली. यामुळे अनन्या तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत व्यवसायिक होणार असे सर्वांना वाटू लागले होते. पण, अनन्याने तिच्या आई-वडिलांना आणि इतर लोकांना तिच्या कर्तबगारीने एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली.


अनन्याने तिची ई-कॉमर्स कंपनी क्यूरोक्रेट सुरु करण्यासह मानसिक स्वास्थ्यासाठी कॅम्पनिंग करण्यासही सुरुवात केली. पण, ती एवढ्यावरच नाही थांबली. जेव्हा लोकांना आता ती थांबेल असे वाटले त्याचवेळी ‘लिव्हइन द लाइफ’ हा म्युझिक अल्बम लाँच केला. संगीत क्षेत्रात पदार्पण करत तिने सेलिब्रिटींच्या उपस्थित सादरीकरण केले. तिचा हा अल्बम ईडीएम आणि पॉप यांचे मिश्रण असून यास डच डीजे एफ्रॉजॅकने मिक्स केलेय. तर अनन्याने स्वतः हे गाणे लिहले असून त्यास कंपोजही केले. या गाण्याचे फिलीपीडियाच्या एका स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.

संगीत आणि अनन्याचे नाते सध्या नवे असले तरी तिने कमी वयातच सितार आणि संतूर वजनाचे धडे घेतले होते. द फ्रे, एड शरीन आणि चेरल कोल हे तिचे प्रेरणास्थान आहेत. तिने आजवर छोट्या मोठ्या सत्तर कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 3:48 pm

Web Title: meet 22 year old ananya birla the successful entrepreneur who decided to turn popstar
Next Stories
1 ‘सिंगल मदर’ होण्यासाठी काजोल उत्सुक
2 दीपिकाचा हा फोटो पाहून हुरळून जाऊ नका
3 ‘आम्ही दोघे राजाराणी’तून अनुभवा निखळ मनोरंजनाची मेजवानी
Just Now!
X