News Flash

ही आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीची मलायका अरोरा

बहुतांशी फोटोंमध्ये तिचा चेहरा मलायकासारखाच दिसतो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा भलेही ४४ वर्षांची असली तरी तिच्याकडे पाहून कोणालाही तिचे इतकं वय असेल असे वाटणार नाही. ती आजही २० वर्षांची वाटते. एकीकडे बॉलिवूडची मलायका आपल्या मैत्रिणींसोबत ख्रिसमस एन्जॉय करतेय तर दुसरीकडे तिच्याचसारखी हुबेहुब दिसणाऱ्या अभिनेत्री हिना पांचालची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. हिनाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीची मलायका अरोरा असे म्हटले जाते.

नुकतेच हिनाने हॉट फोटोशूट केले या फोटोंमध्ये तिच्यातले आणि मलायकामध्ये असलेले साधर्म्य स्पष्ट दिसून येते. तिच्या सगळ्याच फोटोंमध्ये ती फार मादक दिसते.

बहुतांशी फोटोंमध्ये तिचा चेहरा मलायकासारखाच दिसतो. हिना हिंदी, तमिळ आणि तेलगु सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव आहे. तिने सिनेमांत फारसे काम केले नसले तरी तिच्या नावे अनेक आयटम साँग आहेत.

बॉम्बे टाइम्स मासिकामधील टॉप १० बॉलिवूड आयटम गर्ल्सच्या यादीत हिनाला सातवा क्रमांक आहे. तिने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन असे आयटम नंबर केले आहेत. २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटी यादीत हिना पांचालच्या नावाचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 5:27 pm

Web Title: meet heena panchal this look alike of malaika arora has taken instagram to storm
Next Stories
1 चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक का करु, रिचाचा सवाल
2 करिश्माने शेअर केला तैमुरचा क्यूट फोटो
3 Hichki Trailer Out : राणीच्या ‘हिचकी’ची पहिली झलक