‘बिग बॉस १०’ साठी निवड झालेल्या सर्वसामान्य चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे २५ वर्षिय लोकेश कुमारी शर्मा. दिल्ली विद्यापीठातून पदवीधर असलेली लोकेश कुमारीचा जन्म २४ मार्च १९९१ मध्ये जन्मलेल्या लोकेशची रास मीन आहे. तिला नृत्य आणि गाण्याची फार आवड आहे. आयुष्यात जास्तीत जास्त मजा मस्ती करायची आणि मनमुराद जगण्याकडे तिला कल असतो. लोकेश ‘बिग बॉस’च्या या घरी इतर स्पर्धकांना तोडीस तोड टक्कर देईल असा विश्वास तिला वाटतो. नुकतीच तिने दिल्ली विद्यापिठातून मास्टर्सची डिग्री घेतली असून सध्या ती नोकरीच्या शोधात आहे. लोकेशच्या मते, मी अर्थशास्त्रात मास्टर्स केले असून सध्या नोकरीच्या शोधात आहे. मी एकत्रित कुटूंबात राहते. १० लोकांचं आमचं हे कुटुंब चार बेडरुमच्या घरात आनंदाने राहतो.  मला खोटं बोलणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. याशिवाय माझ्या परवानगीशिवाय कोणी माझ्या गोष्टींना हात लावला तरीही मला फार राग येतो.

लोकेश कुमारी ‘बिग बॉस’मध्ये का असावी?- लोकेशमध्ये आत्मविश्वास भरपूर आहे. ‘बिग बॉस १०’ मध्ये इतर स्पर्धकांसोबत तिही तेवढीच आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी आहे. ती दिसताना साधी जरी दिसत असली तरी तिच्या दिसण्यावर कोणीही जाऊ नये. ती शोमधली सगळ्यात जास्त टक्कर देणारी स्पर्धकही होऊ शकते. या शोमध्ये अन्य स्पर्धक आपल्या मादक अदांनी किंवा ग्लॅमरने इतर स्पर्धकांना स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करतील तिकडेच लोकेशकडे सर्वसामान्य जनतेशी जुळून घेण्याचे कसब आहे.

लोकेश फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामवर फार सक्रिय आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच तिला पाठिंबा देणारे अनेक फॅन पेज आतापासूनच बनायला सुरुवात झाली आहे. बिग बॉस १० चा प्रिमिअर १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. १७ ऑक्टोबरपासून निवडलेले सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरी राहायला जातील. या बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक सहभागी होतील. यावेळी आठ सेलिब्रिटींसोबत ८ सर्वसामान्य चेहरेही पाहता येणार आहेत.

लोकेश कुमारीशिवाय निवडण्यात आलेल्या सर्वसामान्य चेहऱ्यांमध्ये रुचिका सिंह, फिरोज खान, काजोल त्यागी, मनोज पंजाबी, मानवीर गुर्जर, मंदिरा चौहान, निखिल मेहता, प्रियांका जग्गा, नवीन प्रकाश, नीतिभा कौल, प्रमोद दहिया आणि देव देवगन यांचाही समावेश आहे.