18 February 2020

News Flash

या अभिनेत्रीने रिक्षासाठी विकली कार, कारण..

महागड्या गाड्यांची क्रेझ असलेल्या जमान्यात अभिनेत्रीने विकत घेतली रिक्षा

यशश्री मसूरकर

मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या गाड्या ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून विकत घेण्याची क्रेझ असताना एका अभिनेत्रीने तिची कार विकून चक्क रिक्षा विकत घेतली आहे. ‘रंग बदलती ओढनी’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री यशश्री मसूरकर हिने ऑटोरिक्षा विकत घेतली आहे. पुरुषप्रधान समाजात काहीतरी वेगळं करण्यात फार मजा आहे, असं ती म्हणते.

कार विकून रिक्षा घेण्यामागचं कारण सांगताना यशश्री म्हणते, “रिक्षामुळे पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतायत. माझ्याकडे जेव्हा कार होती, तेव्हा ड्राइव्हरसाठी वेगळे पैसे द्यावे लागत होते. ड्राइव्हर कधी येऊ शकला नाही तर काम अडून राहायचं. कमी खर्चिक गोष्टींमध्ये माझ्या गरजा पूर्ण होत असतील तर लोक काय विचार करतील याचा मी विचार करत नाही.”

इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा चौकटीबाहेरचा विचार करून स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्यावर यशश्रीचा विश्वास आहे. रिक्षा घेण्याच्या निर्णयावर ती पुढे सांगते, “माझे आई-बाबा जुन्या विचारसरणीचे आहेत. त्यांचं मन राखणं सोपं नव्हतं. मी स्वत: त्यांना एकदा ऑटोरिक्षामधून फिरवून आणलं आणि समजावलं की यात काहीच वाईट नाही.”

“अभिनेत्रीला ऑटोरिक्षा चालवताना पाहून सुरुवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या. महिलेनं रिक्षा चालवणं हीसुद्धा अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट होती. माझ्या सहकलाकारांनीही मला नावं ठेवली. मात्र मी माझ्या निर्णयाशी ठाम होती,” असं ती पुढे सांगते.

यशश्री याच ऑटोरिक्षामधून सेटवर पोहोचते. सुरुवातीला तिला वेडं समजणारे सहकलाकारी आता तिची स्तुती करतात.

First Published on January 26, 2020 4:55 pm

Web Title: meet the tv actress who ditched her car for an auto rickshaw ssv 92
Next Stories
1 विनोदी अंगाने सामाजिक संदेश देणारं ‘सनी तूच माझ्या मनी’ नाटक
2 ‘मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं…’; शाहरुखने सांगितला मुलांचा खरा धर्म
3 ‘ऐका दाजीबा’मधील ही मुलगी आता कशी दिसते?
Just Now!
X