अडल्ट चित्रपटांपासून ते बॉलिवूडच्या बेबी डॉलपर्यंत सनी लिओनीचा प्रवास फारसा सुकर वाटत असला तरीही तो तितका सुकर नव्हता हेच खरं. सनीच्या याच प्रवासावर आणि तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या, कधीही प्रकाशझोतात न आलेल्या प्रसंगावर उजेड टाकणारी एक बायोपिक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’, असं या बायोपिक वेब सीरिजचं नाव असून, त्यातून बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे सध्या या सीरिजविषयी बरीच उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळत आहे. या बायोपिकमध्ये सनीचा आतापर्यंतचा जीवनप्रवास उलगडणार असून, तिच्या तारुण्यावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे.

Sanju Box Office Collection : अवघ्या सात दिवसांत पार केला २०० कोटींचा आकडा

पॉर्न स्टार ते बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख करणारी सनी अनेकांसाठी नवी होती. पण, प्रेक्षकांनीही तिचा मोठ्या मनाने स्वीकार केला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत सनीने यश संपादन केलं. आपल्या या प्रवासाविषयी ‘आएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सनी म्हणाली होती, ‘अनेकांना असं वाटतं की भारतात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांनी माझा विरोध करण्यात सुरुवात केली. पण हे खरं नाहीये. वयाच्या २१व्या वर्षापासूनच मला घृणास्पद मेल येत होते. त्यामुळे मला होणाऱ्या विरोधाचा देशाची काहीच संबंध नाही. पण, हो यात समाजाची भूमिका आहे हेसुद्धा तितकच खरं. मुळात वयाच्या त्याच टप्प्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला होणारा विरोध, इतरांकडून आपली घृणा केली जाणं हे काय असतं याचा प्रत्यय मला आला होता.’ आपल्याला होणारा विरोध आणि शेलक्या शब्दांत होणाऱ्या इतरांच्या टीका पाहता तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्याचंही तिने स्पष्ट केलं. बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोमुळे भारतात सनी प्रकाशझोतात आली. ज्यानंतर ‘जिस्म २’ मधून तिने चित्रपटविश्वात प्रवेश केला. तेव्हापासून सुरु झालेला तिचा हा प्रवास अद्यापही सुरुच असून, आता मात्र सनीचा असा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे.