News Flash

मीता सावरकर चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत

मराठी चित्रपटाची केवढी तरी निर्मिती वाढत्येय, मराठीत केवढ्या तरी तारका आहेत हे हल्ली सांगावे लागत नाही. पण मीता सावरकर मात्र एकाही मराठी चित्रपटातून का बरे

| August 12, 2013 07:06 am

मराठी चित्रपटाची केवढी तरी निर्मिती वाढत्येय, मराठीत केवढ्या तरी तारका आहेत हे हल्ली सांगावे लागत नाही. पण मीता सावरकर मात्र एकाही मराठी चित्रपटातून का बरे दिसत नाही? ‘भारतीय’ला एक वर्ष झाले, पण मीताकडे एकही मराठी चित्रपट का नाही? यावर ती सांगते, अहो मला घाई कुठे आहे? आणि मराठी चित्रपटाची संख्या वढवण्यात मला तर फारसा रस नाही. अधूनमधून मला मराठी चित्रपटाच्या संदर्भात विचारणा केली जाते, पण त्यात आव्हानात्मक असे काही नसते. उगाचचं आपले ‘शोभेची बाहुली’ म्हणून काम करण्यात काय अर्थ आहे? शिवय मराठीत हा गट, तो गट असा प्रकार आहे. मी तूर्त तरी कोणत्याच गटात नाही. माझे मॉडेलिंगमध्ये अगदी उत्तम सुरु आहे. मध्यंतरी तेथेही काम थोडे कमी होते पण संयम पाळला आणि चांगली संधी मिळाली. तसेच मराठी चित्रपटाबाबतही होईल. अगदी नक्की होईल असा मला पूर्ण विश्वास आहे असे मीता सावरकर अगदी मनापासून सांगते. तिच्या प्रचंड आशावादाला आपण भरपूर सदिच्छा देवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 7:06 am

Web Title: meeta sawarkar in search of good role
Next Stories
1 चित्रपटात पैसै नाहीत म्हणून सिया पाटीलला हिंदी मालिका हवी
2 कैद्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात संजय दत्तचा सहभाग
3 जेव्हा मीना कुमारी यांनी नाकारला ‘साहेब, बीवी और गुलाम’
Just Now!
X