X

लंडनहून येणार प्रियांका- निकचे वऱ्हाडी, लग्नाला ‘रॉयल’ जोडप्याची उपस्थिती

२०१७ साली पार पडलेल्या मेट गालाच्या इव्हेंटमध्ये प्रियांका आणि निक हे जोडपं पहिल्यांदा दिसलं.

गेल्या आठवड्यामध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी पारंपारिक पद्धतीने साखरपुडा केला. त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली. त्यामुळे आता साऱ्यांना निक-प्रियांकाच्या लग्नाचे वेध लागले आहे. निक-प्रियांका येत्या ऑक्टबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या लग्नसोहळ्याला कोणकोणत्या व्यक्ती उपस्थित राहणारं याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे.

२०१७ साली पार पडलेल्या मेट गालाच्या इव्हेंटमध्ये प्रियांका आणि निक हे जोडपं पहिल्यांदा दिसलं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा झाली. या चर्चांना पूर्णविराम देत लवकरच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. निक-प्रियांकाचं लग्न साऱ्यांसाठीच खास असल्यामुळे या लग्नात येणारे पाहुणेही खास असणार यात वाद नाही. त्यामुळे सध्या या लग्नात प्रियांकाची जवळची मैत्रीण आणि ब्रिटनच्या राजघराण्याची सून मेगन मार्कलदेखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगली आहे.

हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल आणि प्रियांका एकमेकींच्या चांगल्या आणि जवळच्या मैत्रिणी आहेत. याच मैत्रीखातर प्रियांकाने मेगन मार्कल आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज हॅरी यांच्या विवाहामध्येही उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे मेगनदेखील आपल्या मैत्रीच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रियांकाच्या लग्नात उपस्थित राहणार आहे. इतकंच नाही तर मेगन प्रियांकाची ब्राईडमेडदेखील होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान,राजघराण्यामध्ये मित्र-मैत्रिणींच्या लग्नसमारंभाच्या उपस्थितीविषयी कोणतेही नियम किंवा अटी नसल्यामुळे मेगन या लग्नामध्ये सहभागी होऊ शकते. तसंच मेगनबरोबर राजघराण्यातील युवराज हॅरीदेखील येऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी प्रियांकाने मेगन आणि युवराज हॅरी यांच्याबरोबर निकची भेट घडवून दिली होती.त्यामुळे युवराज हॅरी आणि निक एकमेकांचे मित्र झाल्याचं समोर येत आहे.

First Published on: August 23, 2018 8:58 am