News Flash

शाही विवाहसोहळ्याचा वाद चव्हाट्यावर; लग्न मोडण्यासाठी मेगनच्या भावाने लिहिलं खळबळजनक पत्र

'अजूनही उशीर झालेला नाही. खूप उशीर होण्यापूर्वी तिच्यासोबत आधीच लग्न मोड. शाही कुटुंबाची प्रतिष्ठा ती पार धुळीला मिळवेल', असं थॉमसनं पत्रात म्हटलं आहे.

१९ तारखेला मेगन आणि प्रिन्स हॅरीचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. (AP Photo/Matt Dunham)

एकीकडे ब्रिटनमध्ये शाही विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. हॉलीवूड स्टार मेगन मर्कल आणि प्रिन्स हॅरी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे ब्रिटनची जनता आणि मेगचे चाहते हा विवाहसोहळा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. सगळेच आनंदात आहेत पण, या शाही विवाहसोहळ्यामुळे मेगनचा भाऊ मात्र कमालीचा अस्वस्थ झाला आहे. मेगनशी लग्न करण्याची घोडचूक अजिबात करू नकोस असं खळबळजनक पत्र थॉमस मर्कल ज्यूनिअरनं लिहिलं आहे.

‘अजूनही उशीर झालेला नाही. खूप उशीर होण्यापूर्वी तिच्यासोबत आधीच लग्न मोड’, असं थॉमसनं पत्रात म्हटलं आहे. ‘मेगन ही खूप उथळ मुलगी आहे. तिच्या डोक्यात टिचभर प्रसिद्धीची हवा गेली आहे. तुमच्यासाठी ती सुयोग्य वधू नाही. हे लग्न होणं म्हणजेच शाही कुटुंबाच्या इतिहासातली सर्वात मोठी घोडचूक ठरेल. मेगन तुमच्या आणि शाही कुटुंबाची प्रतिष्ठा पार धुळीला मिळवेल. राजघराण्याचा ती अक्षरश: विनोद करून ठेवेल.’अशी जळजळीत टीका करत थॉमसनं एकच खळबळ उडवून दिली आहे.

१९ तारखेला मेगन आणि प्रिन्स हॅरीचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. राजकीय नेते वगळता जगातल्या मोजक्याच लोकांना या विवाहसोहळयासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. आश्चर्य म्हणजे या सोहळ्यासाठी मेगननं तिच्या कुटुंबियांनाही आमंत्रीत केलं नसल्याच्याही चर्चा आहेत. मेगन आणि ५१ वर्षीय थॉमसमध्ये वाद आहेत. २०११ पासून या दोघांनी एकमेकांशी संबंध तोडला आहे. लग्न जवळ आलं असताना या दोघांमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. ‘जी स्त्री आयुष्यातल्या महत्त्वाच्या दिवशीदेखील आपल्या कुटुंबियांना बोलावणं महत्त्वाचं समजत नाही. याऐवजी अनोळखी लोक तिला जवळचे वाटतात ती कशी असेल हे वेळीच समजून जा’ असंही थॉमसनं आपल्या पत्रात म्हटल्याची माहिती ‘दी इन्डीपेन्डन्ट’नं दिली आहे.

‘मेगनची वाईट बाजू तुम्हाला का दिसत नाही याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं, तिच्यामुळे वडिलांवरही दिवाळखोर होण्याची वेळ आली होती’ असे अनेक आरोप करत थॉमसनं लग्नाआधी एकच खळबळ उडवून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:10 pm

Web Title: meghan markle brother asked prince harry to cancel the royal wedding before its too late
Next Stories
1 ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील कलाकारांचं मानधन ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
2 सोनम लग्नात कोणता ड्रेस घालणार समजलं का ?
3 Video: …जेव्हा अर्जुन बहिणी आणि काकूंच्यामध्ये फसतो