गेल्याच महिन्यात ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर दुसऱ्यांदा मेगन सार्वजनिक कार्यक्रमात दिसली. तर पहिल्यांदाच मेगननं राणी एलिझाबेथ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये सहभाग घेतला. मात्र याच सोहळ्यासाठी मेगननं केलेल्या वेशभूषेमुळे सर्वसामान्यांचा रोष तिनं ओढावून घेतला.

गेल्या आठवड्यात राणीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यानिमित्तानं ट्रुपिंग द कलर सेरेमनी आयोजीत करण्यात आली होती. यासोहळ्यासाठी डचेस ऑफ ससेक्स मेगन हिनं ऑफ शोल्डर ड्रेसची निवड केली. पिच रंगाचा या ऑफ शोल्डर ड्रेस आणि हॅटमध्ये मेगन फारच सुंदर दिसत होती. पण, याच ड्रेसमुळे ती टीकेची धनी ठरली. तिनं शाही कुटुंबाचे ड्रेसकोडबाबत असलेले नियम मोडले असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. शाही कुटुंबातील महिलांसाठी ड्रेसकोडचे नियम कडक आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकजण ते काटेकोरपणे पाळतात.

..म्हणून मेगन आणि प्रिन्स हॅरी लग्नात आलेल्या कोट्यवधी किंमतीच्या भेटवस्तू करणार परत

पण मेगन मात्र हे नियम पाळताना दिसत नाही. शाही घराण्यातील महिलांनी सर्वाजनिक ठिकाणी ऑफ शोल्डर किंवा ज्यातून खांदे दिसतील असे कपडे परिधान करू नये असा नियम आहे मात्र मेगननं हा नियम जाणीवपूर्वक मोडून राणीचा अपमान केला असल्याचं अनेक ट्विटर युजर्सचं म्हणणं आहे. पण काहींनी मात्र अनेकदा प्रिन्सेस डायना यांनी देखील ऑफ शोल्डर ड्रेस घातले असल्याचं दाखवून दिलं आहे. एकीकडे रॉयल प्रोट्रोकॉल मोडले म्हणून तिच्यावर टीका करणारेही आहेत तर दुसरीकडे ती बदल घडवू पाहत आहेत म्हणून तिचं कौतुकही करणारे अनेक आहेत.