News Flash

Royal wedding : मुलीच्या लग्नात वडिलच राहणार अनुपस्थित

मेगनचे कुटुंबिय उपस्थित राहणार की नाही यावर अनेक चर्चा होत्या. पण आता मात्र मुलीच्या आयुष्यातील या खास क्षणासाठी थॉमस मात्र गैरहजरच राहणार असल्याचं म्हटलं जातं

१९ तारखेला मेगन आणि प्रिन्स हॅरीचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. (AP Photo/Matt Dunham)

मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाहसोहळा १९ मेला पार पडणार आहे. आठवड्याच्या शेवटी पार पडणाऱ्या या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. परिकथेला साजेसा असा हा शाही विवाहसोहळा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. पण या सोहळ्यासाठी मात्र मेगनचे वडील थॉमस मर्केल अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या सहभागावर अजूनही संभ्रम आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेगनचे कुटुंबिय उपस्थित राहणार की नाही यावर अनेक चर्चा होत्या. पण आता मात्र मुलीच्या आयुष्यातील या खास क्षणासाठी थॉमस मात्र गैरहजरच राहणार असल्याचं म्हटलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी थॉमस यांनी स्वत:चे काही फोटो वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांना दिले होते. लग्नासाठी कपडे निवडतानाचे ते फोटो होते, हे फोटो केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी त्यांनी दिले असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यामुळे त्यांची चांगलीच नाचक्की झाली होती. ब्रिटनच्या शाही कुटुंबासमोर मेगनला संकोचल्यासारखं वाटू नये म्हणूनच ते शाही लग्नसोहळ्यासाठी अनुपस्थित राहणार असं अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.

Jumbo ‘royal’ cake: ब्रिटनच्या राजघराण्यातील लग्नाच्या निमित्ताने तिने बनवला ‘रॉयल’ केक

पण या कारणाव्यतिरिक्त आणखी एक गंभीर कारण असण्याचीही शक्यता आहे. मेगनच्या वडिलांना गेल्याच आठवड्यात हृदयविकाराचा झटका आला होता. या आठवड्यात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया होणार आहे त्यामुळे ते येऊ शकणार नाही असंही म्हटलं जात आहे. त्यांच्या तब्येतीविषयी आणि शाही लग्नातील त्याच्या सहभागाविषयी तुर्तास तरी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मेगनच्या आई- वडिलांचा तिच्या लहानपणीच घटस्फोट झाला होता. या सोहळ्यासाठी मेगनची आई उपस्थित राहणार आहे पण तिनं लग्नात आपल्या सावत्र भावंडांना आमंत्रण देण्याचं मात्र टाळलं आहे.

५९२ तास, ३९,००० विटा आणि ८ कारागीर पाहा कसा उभारला राजमहाल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 5:34 pm

Web Title: meghan markle father may miss royal wedding
Next Stories
1 मालिकांबाबत प्रेक्षकांना नेमकं काय वाटतं
2 गरोदरपणात मीरा राजपूतला होतोय ‘हा’ मनस्ताप
3 आमिरच्या ‘महाभारत’ चित्रपटात सलमान साकारणार ‘ही’ भूमिका?
Just Now!
X