News Flash

शाही जोडप्यासोबत प्रियांका चोप्राची ‘ती’ वागणूक पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर

या शाही जोडप्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात दमदार स्वागत करण्यात आलं. पण बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मात्र टाळ्या वाजवल्या नाही.

केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम हे शाही जोडपं रविवारी महिला विम्बलडन फायनलचा आनंद घेण्यासाठी रॉयल बॉक्समध्ये पोहोचले होते. यावेळी या शाही जोडप्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात दमदार स्वागत करण्यात आलं. पण बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मात्र या शाही जोडप्यांच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवल्या नाही. यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून फॅन्स आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत.

महिला विम्बलडन फायनल सुरू असलेल्या स्टेडिअममध्ये जेव्हा केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम या शाही जोडप्याने एन्ट्री केली, त्यावेळी प्रत्येकजण टाळ्या वाजवत उत्साहात त्यांचं स्वागत करताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मात्र आपला स्काफ ठीक करताना दिसून येतेय. स्टेडिअममध्ये प्रत्येकजण टाळ्या वाजत या शाही जोपड्याचं स्वागत करत होते, पण प्रियांका चोप्राने मात्र त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत. या शाही जोपड्याला प्रियांका चोप्रा इग्नोर करताना दिसून आली.


सोशल मीडियावर यावरून वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः महापूर आलाय. नेटकरी मंडळी हा व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कुणी प्रियांका चोप्राने हे जाणूनबुजून केलं असल्याचं बोलत आहे, तर कुणी प्रियांका चोप्राच्या या वागण्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

ब्रिटीश राजघराण्यातली अस्वस्थता जगजाहीर आहे. इंग्लंडच्या राणींचे नातू आणि राजघराण्याचे सहावे वारसदार प्रिन्स हॅरी याने हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल हिच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला महाराणी एलिझाबेथ यांचा विरोध होता. लग्नानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल हे राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य या भूमिकेतून बाजूला होत कॅलिफोर्नियामध्ये राहू लागले. पण तरीही या राजघराण्यात काही अलबेल दिसून येत नाही. प्रिन्स हॅरीचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम यांची पत्नी केट मिडल्टनशी मेगनचा फ्लॉवर गर्ल कपड्यासंदर्भात वाद देखील झाला होता. यावेळी केटने मेगनला रडवलं होतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेगन आणि प्रियांका खास मैत्रणी आहेत. मेगनच्या शाही लग्नातही प्रियांकाची उपस्थिती नजरेत भरण्यासारखी होती. त्यामूळे प्रियांकाने मैत्रिण मेगनमुळे प्रिन्स विल्यम आणि केटला जाणूनबुजून दुर्लक्ष केलं, अशी चर्चा सध्या सुरूय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 1:29 pm

Web Title: meghan markle priyanka chopra ignored prince william kate middleton wimbledon prp 93
Next Stories
1 ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
2 प्रवीण तरडे सांगणार बलुचिस्तानातील मराठ्यांची विजयगाथा; ‘बलोच’ चित्रपटाची घोषणा
3 ‘नदिया के पार’ फेम अभिनेत्रीवर कोसळले आर्थिक संकट; चाहत्यांकडे मागितली मदत
Just Now!
X