News Flash

छपाक’च्या शूटिंगदरम्यान मेघना गुलजार भावूक

दीपिका पदुकोणच्या आगामी 'छपाक' चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.

छपाक’च्या शूटिंगदरम्यान मेघना गुलजार भावूक
दीपिका पदुकोण,मेघना गुलजार,विक्रांत मेस्सी

दीपिका पदुकोणच्या आगामी ‘छपाक’ चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले असून या प्रसंगी दिग्दर्शिका मेघना गुलजार भावूक झाल्या होत्या. त्यांनी इंन्टाग्राम खात्यावरून टीमसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मेघना गुलजार यांनी सगळ्यांना मिठी मारून फोटो काढले आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण लक्ष्मीची भूमिका साकारत असून यासाठी तिने बरीच तयारी केली आहे.  चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दीपिका व विक्रांतसोबत फोटो काढताना मेघना जास्तच भावुक दिसत आहेत. फोटोसोबतच ‘..आणि शूटिंग संपले आहे. मालती ..अमोल .. मी कायमच तुम्हाला आठवणीत ठेवेन. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल थँक्यू.’ असेही त्यांनी लिहिले आहे.

एका फोटोमध्ये मेघना शेवटचा सीन दिग्दर्शित करताना दिसत आहेत. या चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. ‘छपाकचा प्रवास अवर्णनीय होता.’ असेही त्यांनी लिहिले आहे.

मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला दिली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. तसेच मालती उर्फ दीपिकाला अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे. छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 3:37 pm

Web Title: meghana gulzar emotional deepika padukone chhapak djj
Next Stories
1 ‘सूर्यवंशी’मध्ये हा अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका
2 ‘कबीर सिंग’मधील भूमिकेसाठी शाहिदने अशी केली तयारी
3 …म्हणून अनन्या पांडेला नाइट क्लबमध्ये नाकारला प्रवेश
Just Now!
X