21 January 2021

News Flash

अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ला मीरा राजपूत काय म्हणाली ऐकलंत का?

जॅकेटवरील हा मजकूर पाहताच मेलिनिया यांच्यावर सर्वच स्तरातून टिकेची झोड उठू लागली.

मीरा राजपूत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने मेलिनिया यांनी नुकतीच अमेरिका-मेक्सिको सिमेवरील निर्वासितांच्या छावणीमधील लहान मुलांची भेट घेतली. मात्र या भेटीला जाताना मेलिनिया यांनी घातलेल्या जॅकेटमुळे त्यांच्यावर नवा वाद ओढविल्याचं पाहायला मिळालं. मेलिनिया यांनी घातलेल्या ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या जॅकेटवर ‘मी खरंच (तसल्या गोष्टींची) काळजी करत नाही, तुम्ही करता का?’ (I REALLY DON’T CARE, DO U?) असं लिहिलेलं होतं. जॅकेटवरील हा मजकूर पाहताच मेलिनिया यांच्यावर सर्वच स्तरातून टिकेची झोड उठू लागली. त्यातच आता बॉलिवूड कलाकारांनीही उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

निर्वासितांबद्दल ट्रम्प प्रशासनाने शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याने राष्ट्राध्यक्षांवर टीका होत असतानाच मेलानिया यांनी मुद्दाम अशाप्रकारचा संदेश असणारे जॅकेट घातल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. मात्र मेलानिया यांच्यावर होणाऱ्या टिकेला थेट राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून ट्विट करुन टिकाकारांना आणि ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. मात्र तरीदेखील मेलिनिया यांच्यावर होणारी टीका काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यातच आता शाहीद कपूरची बायको मीरा राजपूत हिनेदेखील मेलिनिया यांना प्रश्न विचारला आहे.

मेलिनिया यांच्या जॅकेटवर ‘मी खरंच (तसल्या गोष्टींची) काळजी करत नाही, तुम्ही करता का?’ (I REALLY DON’T CARE, DO U?) असं लिहिल्यावर मीरा राजपूतनेही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर मेलिनिया यांचा फोटो शेअर करुन त्यावर ‘खरंच का?’ असा प्रश्न विचारला आहे. मीराच्या या प्रश्नानंतर आता मेलिनिया यांच्यावर बॉलिवूडमधूनही प्रश्नांचा भडीमार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या मीरा दुस-यांदा आई होण्याचा अनुभव एन्जॉय करत असून तिने बेबीबंपचे काही फोटो शेअरही केले आहेत. यापूर्वी मीरा आणि शाहीदला २०१६मध्ये मिशा नावाची एक मुलगीदेखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 3:42 pm

Web Title: melania trump mira rajput has a question
Next Stories
1 बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 IIFA 2018 : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी रेखा बँकॉकमध्ये दाखल
3 ‘या’ कारणामुळे सलमानने मानले चाहत्यांचे आभार!
Just Now!
X