अभिनेत्री सना खान नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. गेली तीन वर्ष ती नृत्यदिग्दर्शक मेलव्हिन लुईसला डेट करत होती. मात्र त्याने तिचा विश्वासघात केला, त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, असा आरोप सनाने केला. या आरोपांवर आता लुईसने तिला प्रत्युत्तर दिले आहे. मेलव्हिन लुईसने सना आणि त्याच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यापूर्वी मेलव्हिनने तिच्यावर केलेले आरोप तिने या क्लिपमध्ये मान्य केले आहेत. तसेच ब्रेकअपचे प्रकरण केवळ प्रसिद्धीसाठी लावून धरले होते. हे देखील सनाने मान्य केले आहे. ही ऑडिओ क्लिप फोनवर झालेल्या त्यांच्यातील खासगी संभाषणाची आहे. View this post on Instagram You mocked me ! You mocked my race and my skin color ! You mocked my family ! You mocked my most favourite people with disgusting allegations ! You did your best ! I hope you feel better now PUBLICLY ! #MenAreVictimsToo #YouAskedForIt #NotGuilty #BulaatiHaiMagarJaaneKaNahi . . . . P.S : For all those who didn’t judge too quick or jump to make quick conclusions , I remember your names and you have my respect ! Thank you for not judging a book by its cover #LoveAndRespectToAll #PooraAudioNoteSunogeTohGirJaaoge #BasAbhiDoneZyadaDramaNahi A post shared by Melvin Louis (@melvinlouis) on Mar 6, 2020 at 8:08am PST तसेच या क्लिपवर त्याने, "तू माझ्या कुटुंबाची खिल्ली उडवलीस. तू माझ्यावर वर्णभेदी टिप्पणी केलीस. तू माझ्यावर खोटे आरोप केलेस. मला खात्री आहे की, आता तुला प्रसिद्धी मिळवून खूप आनंद मिळाला असेल." अशा आशयाची कॉमेंट लिहिली आहे. View this post on Instagram This is my first n it has taken a lot of courage from me to come out n speak the truth. Coz there were so many people who believed in this relation n showed so much love n respect but unfortunately I didn’t get it from where I should have gotten. This man is dirt n he is disgusting unfortunately it took me a year to find out coz I believed in him blindly. I have taken a stand for myself coz if I won’t no one will He is a compulsive cheater n a compulsive liar n this is his regular thing to do with everyone for his fame n popularity. This is the original content with no fabrication but be ready for the covers on this Ps: cheated on me with multiple girls since may/June which I lately discovered but there is one girl tht shocked me the most n I knw her #shameonyou miss I will def tell the world ur name so atleast others knw u before they collab with you Upbringing matters a lot He wanted to marry me and have babies what would he teach my son n daughter??? #toxicrelationship #cheappeople A post shared by Sana Khaan (@sanakhaan21) on Feb 11, 2020 at 10:02pm PST काय म्हणाली होती सना खान? “खरं तर पहिल्यांदाच मी आमच्या नात्याविषयी इतक्या मोकळेपणाने बोलत आहे. खरं बोलायला खूप हिंमत लागते. जवळपास वर्षभरापूर्वी त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध होते. माझं दुर्दैव हे की मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं” मेलव्हिनसोबत ब्रेकअप केल्यानंतर सनाने अशा आशयाची इन्स्टा पोस्ट लिहिली होती.