News Flash

वीरमाहदेवी सिनेमाचे पोस्टर फाडून सनी लियोनीचा निषेध

हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे, मात्र या सिनेमातील भूमिकेलाच विरोध दर्शवण्यात आला आहे

बंगळुरूमध्ये आज कर्नाटक रक्षा वेदिक (केआरवी) च्या युवा सेनेने अभिनेत्री सनी लियोनीच्या वीरमाहदेवी या सिनेमाचे पोस्टर फाडून निषेध केला. वीरमाहदेवी या सिनेमात अभिनेत्री सनी लियोनीची मुख्य भूमिका का आहे असा प्रश्न विचारत या सेनेने आंदोलन केले. वीरमाहदेवी हा अभिनेत्री सनी लियोनीचा पहिला तामिळ सिनेमा आहे. या सिनेमात वीरमाहदेवी या मुख्य भूमिकेत सनी लियोनी झळकणार आहे. या सिनेमाचे पोस्टर जेव्हा ट्विटरवर आले होते तेव्हा या पोस्टरला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशातच या सिनेमात असलेल्या सनी लियोनीच्या मुख्य भूमिकेलाच निषेध करत आज या सिनेमाची पोस्टर्स फाडण्यात आली. हा सिनेमा एकाच वेळी तमिळ, हिंदी, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये डब होऊन प्रदर्शित केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 5:43 pm

Web Title: members of karave yuva sene the youth wing of pro kannada outfit karnataka rakshana vedike krv today tore the posters of veeramahadevi
Next Stories
1 नवविवाहितेवर पतीसह सातजणांकडून लग्नाच्या पहिल्याच रात्री सामूहिक बलात्कार
2 Rafael Deal : ..तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिलं नाही – तारिक अन्वरांचा प्रश्न
3 हसीन जहाँपासून मला धोका, मोहम्मद शमीने केली सुरक्षारक्षकाची मागणी
Just Now!
X