News Flash

‘प्राजक्ता माळी इतनी क्यूट कैसे है?’, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

प्राजक्ताने स्वत: हे मीम्स शेअर केले आहेत.

(Photo Credit: prajatka mali instagram)

आपल्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा देखील विषय ठरतात. पण आता प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो नाही तर तिचे काही मीम्स शेअर केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे मीम्स शेअर केले आहेत. पहिल्या मीममध्ये प्राजक्ताचे तीन फोटो दाखवण्यात आले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती स्वयंपाक करताना दिसत आहे. या फोटोवर “आजीला अशी नातसून पाहिजे” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या फ्रेममध्ये प्राजक्ता पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोवर “मम्मीला अशी सूनबाई पाहिजे” असे लिहिले आहे. तिसऱ्या फ्रेममध्ये प्राजक्ता वेस्टन लूकमध्ये दिसत आहे. या फोटोवर “आणि मला अशी बायको” असे म्हटले आहे. या तिन्ही फोटोंच्या खाली “संपला विषय” असे लिहिले आहे. हे मीम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा : जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूरच्या १७ वेळा लगावली होती कानशिलात, जाणून घ्या कारण

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

दुसऱ्या मीममध्ये CID मधील शिवाजी साठम दिसत आहेत. ते बोलताना दिसत आहेत की “दया पता लगाओ की प्राजक्ता माळी इतनी क्यूट कैसे है.” सध्या प्राजक्ताचे हे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. काही सामाजिक कार्यक्रमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग असतो. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 5:20 pm

Web Title: memes on prajatka mali avb 95
Next Stories
1 “पत्नीच्या भावाने CCTV बंद करुन मारले आणि आता…”,करण मेहराने सांगितली त्या रात्रीची कहाणी
2 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ‘दादाजीं’वर कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड; भाड्याच्या घरात राहतात
3 अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोवर मलायकाची कमेंट, म्हणाली…
Just Now!
X