बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण कधीकधी अमिताभ यांना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकताच अमिताभ यांच्यासोबत असेच काहीसे घडले आहे.
अमिताभ यांनी ट्विटर अकाऊंटवर त्यांचा एक फोटो नुकताच शेअर केला होता. या फोटोमध्ये ते पलंगावर झोलपलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘झोपण्याची वेळ झाली.. शूभ रात्री’ असे म्हटले होते. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच काहींनी मीम्स तयार करत त्यांना ट्रोल केले आहे.
— chintubaba (@chintamani0d) April 6, 2021
Sir lagta ha Swami Ramdev ki dava galat Aeser kr gyi ha pic.twitter.com/Liu910FODc
— Umair (@UmairBu69952473) April 6, 2021
एका यूजरने बिग बी झोपेचे सोंग घेत आहेत असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने बिग बींना रेखाचे स्वप्न पडले असेल असे म्हणत ट्रोल केले आहे.
— (@div_070) April 6, 2021
बिग बींचा ‘चेहरे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता इम्रान हाश्मी, क्रिस्टल डिसुजा, रिया चक्रवर्ती दिसणार आहेत. तसेच अमिताभ यांचा अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ देखील प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात देखील ते काम करताना दिसणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2021 4:58 pm