News Flash

‘अवतार’ची ऑफर नाकारल्यामुळे गोविंदा झाला ट्रोल, मीम्स व्हायरल

सध्या हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

नुकताच एका वृत्तवाहिनीवरील ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा पोहोचला होता. दरम्यान त्याने सुपरहिट हॉलिवूड सिनेमा अवतारचे नाव मीच दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांना सुचवले होते, इतकेच नाही तर त्यांनी मला या सिनेमाची ऑफर देखील दिली होती पण मी ती नाकारली असा आश्चर्यकारक खुलासा केला होता. गोविंदाच्या या खुलाश्यावरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

नेटकऱ्यांनी गोविंदाला या वक्तव्यमुळे ट्रोल केले आहे. अनेकांनी गोविंदाचा फोटो एडीट करुन त्याची खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने तर ‘अवतार’ चित्रपटातील एका सीनला गोविंदाच्या गाण्याचे बॅग ग्राऊंड म्यूझिक दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हे मीम्स तुफान व्हायरल झाले आहेत.

Next Stories
1 एन.एस.एस.च्या कॅम्पला आजही आवर्जून जाते
2 ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ नृत्य स्पर्धेत वसई, भाईंदरचे कलाकार उपांत्यपूर्व फेरीत
3 “योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मालक नाहीत”, अनुराग कश्यपनं सुनावलं
Just Now!
X