16 July 2018

News Flash

टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात

'नच बलिये ७'मध्ये झळकलेल्या या जोडीने गुपचूप लग्न केले. मोजक्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईत हा लग्नसोहळा पार पडला.

मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून छोट्या पडद्यावरील बहुचर्चित जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेता शक्ती अरोरा आणि नेहा सक्सेना यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली असून सोशल मीडियावर लग्नानंतरचा फोटो शेअर केला आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर नोव्हेंबर २००१६ मध्ये शक्ती आणि नेहा लग्न करणार अशा चर्चा होत्या. मात्र, नोटाबंदीमुळे लग्न पुढे ढकलल्याचं म्हटलं जात होतं.

‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ६ एप्रिल रोजी शक्ती- नेहाने मुंबईत लग्न केले. या लग्नसोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळीच उपस्थित होते. दोघांनीही इन्स्टाग्रामवर लग्नानंतरचा फोटो शेअर केला आहे. ‘आपण एकत्र असणं हीच सर्वांत सुंदर गोष्ट आहे,’ असं कॅप्शन शक्तीने या फोटोला दिलं आहे.

Together is a wonderful place to be! ❤️

A post shared by Shakti Arora (@shaktiarora) on

❤️

A post shared by Neha Saxena💫 (@nehaasaxena) on

Video : ‘ती’ पुन्हा आली आहे नजरेनं घायाळ करायला!

निर्माती एकता कपूरच्या ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेतून शक्ती अरोरा घराघरात पोहोचला. शक्ती आणि नेहाने ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. ‘तेरे लिए’ या मालिकेदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

First Published on April 17, 2018 1:43 pm

Web Title: meri aashiqui tumse hi actor shakti arora ties the knot with fiancee neha saxena