News Flash

‘#MeToo मोहिमेने पितृसत्ता संस्कृतीला धक्का दिला, पुढील लढाई आणखी कठीण’

#MeToo मोहिमेअंतर्गत कलाविश्वातील बरीच मोठी नावं समोर आली.

सुशांत सिंग

देशभरात सध्या #MeToo चं वादळ घोंघावत आहेत आणि या मोहिमेअंतर्गत कलाविश्वातील बरीच मोठी नावं समोर आली. त्यामुळे कलाविश्वासोबतच अन्य क्षेत्रातही एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत याविषयी अनेक दिग्गजांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यातच आता ‘सिंटा’चे सरचिटणीस सुशांत सिंगनेदेखील त्यांच मत मांडलं आहे.

‘कलाविश्वामध्ये #MeToo मुळे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी स्पष्टपणे बोलत आहेत. विशेष म्हणजे या मोहिमेमुळे आता पितृसत्ता संस्कृतीला धक्का बसल्याचं दिसून येत आहे. महिलांनी पुकारलेली ही लढाई पुढे आणखी कठीण होणार आहे’, असं सुशांत सिंग म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘कलाविश्वाप्रमाणेच अन्य क्षेत्रातील पुरुषांवरही महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. परंतु आपल्या येथे कायम पितृसत्ता चालत आलली आहे. त्यामुळे आरोप झालेल्या व्यक्तीही त्यांच्यावरील आरोप मान्य करण्यास तयार नाही. याच कारणामुळे हा वाद आणखी वाढणार आहे. # MeToo ही खरचं धक्का देणारी मोहिम आहे. या मोहिमेमुळे अनेकांची खरी रुप समोर आली आहेत’.

दरम्यान, नाना पाटेकर- तनुश्री दत्ता यांच्या वादानंतर सुरु झालेल्या #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत. यात विकास बहल, साजिद खान, अनु मलिक, अनिर्बान ब्लाह, आलोक नाथ, चेतन भगत, गुरसिमरन खंबा, साजिद खान यासारख्या कलाकारांवर आरोप करण्यात आले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 10:10 am

Web Title: metoo has shaken up the patriarchy tough fight ahead sushant singh
टॅग : MeToo
Next Stories
1 दीप-वीरच्या लग्नात ‘या’ कलाकारांची खास उपस्थिती
2 #MeToo : वैयक्तिक वादातून माझ्यावर आरोप, विकास बहलचं ‘IFTDA’ च्या नोटिशीला उत्तर
3 राज ठाकरे, नाना पाटेकरांनी भाव न दिल्याने तनुश्रीने मला लक्ष्य केले: राखी सावंत
Just Now!
X