21 February 2019

News Flash

#MeToo मूर्खपणा, इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाही- शिल्पा शिंदे

महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत असताना अभिनेत्री शिल्पा शिंदेने #MeToo मोहिमेवर टीका केली आहे.

#MeToo मोहिमेतंर्गत अनेक महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत असताना अभिनेत्री शिल्पा शिंदेने #MeToo मोहिमेवर टीका केली आहे. #MeToo मोहिम एक मूर्खपणा आहे. इंडस्ट्रीमध्ये बलात्कार वैगेरे काही होत नसतो. दोन व्यक्तींमधये जे काही घडते ते सर्व संमतीने होते असे शिल्पा शिंदेने म्हटले आहे.

टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना शिल्पा म्हणाली कि, ज्यावेळी तुमच्या बरोबर काही चुकीचे घडते त्याचवेळी तुम्ही बोलले पाहिजे. नंतर बोलून काय उपयोग ? मला सुद्धा धडा मिळाला आहे. ज्यावेळी घडते त्याचवेळी बोला नंतर बोलून काही फायदा नाही. जेव्हा काही चुकीचे घडते तेव्हा तुम्ही शांत राहता आणि नंतर बोलता त्याचा उपयोग नाही. नंतर तुमचे म्हणणे कोणी ऐकणार नाही. त्यातून फक्त वाद उत्पन्न होईल. बाकी काही होणार नाही. ज्यावेळी तुमच्याबरोबर काही चुकीचे घडते त्याचवेळी तुम्ही बोलले पाहिजे. तेवढी तुमच्यात हिम्मत असली पाहिजे असे शिल्पा म्हणाली.

ही इंडस्ट्री वाईटही नाही आणि चांगलीही नाही. प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडत असतात. प्रत्येकजण स्वत:च इंडस्ट्रीचे नाव का खराब करतोय ? ते मला समजलेले नाही. समोरचा माणूस तुमच्याशी कसा वागतो? तुम्ही त्याला कसे उत्तर देता. हा सर्व देण्या-घेण्याचा व्यवहार आहे. आता काही महिला बोलत आहेत पण इंडस्ट्रीत बलात्कार होत नाहीत हे मी त्यावेळी सुद्धा बोलले होते. जबरदस्ती होत नाही. इंडस्ट्रीमध्ये जे काही होते ते संमतीने घडते. जर तुम्ही तयार नसाल तर विषय सोडून द्या असे शिल्पा म्हणाली.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सुरु झालेल्या या #MeToo मोहिमेमुळे फिल्म इंडस्ट्रीतील अनेक नामांकित चेहरे अडचणीत आले आहेत. चेतन भगत, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल, साजिद खान, आलोक नाथ, सुभाष घई अशा अनेकांवर महिलांनी बलात्कार आणि लैंगिक जबरदस्तीचे आरोप केले आहेत.

 

First Published on October 12, 2018 2:45 pm

Web Title: metoo movement rubbish shilpa shinde
टॅग MeToo,Shilpa Shinde