News Flash

#MeToo : नरेंद्र मोदींनी महिलांच्या बाजूने उभं राहायला हवं – सोना मोहपात्रा

गायिका सोना मोहपात्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ५० टक्के मतदारांसाठी (महिला) भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे

सध्या देशभरात #MeToo मोहिमेवरुन वादळ उठलं असून गायिका सोना मोहपात्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ५० टक्के मतदारांसाठी (महिला) भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. सोना मोहपात्राने सोमवारी एम जे अकबर यांच्याशी संबंधित एक बातमी ट्विट करत हे मत व्यक्त केलं आहे. पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि विद्यमान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला आहे.

सोना मोहपात्राने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रिय नरेंद्र मोदी सर, तुमच्या ५० टक्के महिला मतदारांसाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही वारंवार असा गुन्हा करणाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. अनेक महिला आपल्याला सामोरं जावं लागलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीचे अनुभव शेअर करत आहेत. त्यांना यातून काही मिळणार नाही आहे. कृपया आमचं ऐका’.

दरम्यान एम जे अकबर यांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रामानींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका करण्यात आली आहे.

Next Stories
1 Video : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री
2 #MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा
3 #MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा
Just Now!
X